Posts

Showing posts from December, 2020
Image
शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे इंदापूर येथील पुनीत जाधव अनुकंपा तत्वावरील नोकरीपासून वंचित!   शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल इंदापूर (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे रायगड जिल्ह्यातील इंदापूर, ता. माणगांव येथील पुनीत परशुराम जाधव हा आजपर्यंत अनुकंपा तत्वावरील नोकरीपासून वंचित राहिलेला आहे. याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. माणगांव तालुक्यातील इंदापूर येथील प्राथमिक शिक्षीका कै. पुजा परशुराम जाधव ह्या दि. १ जुलै २०१४ रोजी मयत झाल्या. त्यांचे वारस पुनीत परशुराम जाधव हे डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजीराव एस. जोंधळे पॉलिटेक्नीक, आसनगांव, जि. ठाणे येथे ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदविका व पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे येथे ऑटोमोबाईल या शाखेत एस.वाय.बी.ए. ला शिक्षण घेत होते. त्यामुळे अनुकंपा तत्वावील नोकरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी माणगांव यांच्याकडे विलंबाने पाठविण्यात आला. त्यानंतर रा.जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सदरचा प्रस्ताव व विलंबाचा खुलासा विभागीय आयुक्त...
Image
सकलप गावाजवळ पर्यटकांची बस पलटी होऊन अपघात, सुदैवाने जीवीतहानी टळली! श्रीवर्धन (ओमकार शेलार) : श्रीवर्धन कडे जाणाऱ्या मार्गावर सकलप गावाजवळ विरार वरुन श्रीवर्धन, हरिहरेश्वर याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या ५० सिटर खासगी बस पलटी होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही व मोठा अनर्थ टलळा. असा मोठा अपघात याठिकाणी पहिल्यांदाचा झाला आहे. येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भविष्यात मोठमोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी येथील समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
Image
वरचीवाडी विळे येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी, तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे परायण पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील वरचीवाडी विळे येथे रविवारी दि. 27/12/2020 ते बुधवार दि. 30/12/2020 पर्यंत श्री दत्त मंदिरात वर्ष 34 व्या दत्त जयंतीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायणाचे आयोजन करण्यात आले होते. वरचीवाडी विळे हे बारा बलुतेदारांचे गाव, पण तरीही प्रत्येक घरातील सदस्य अगदी बालकांपासून वृद्धांपर्यंत या कार्यक्रमात सहभागी होतात. महिला घरच्या कामाला फारसे महत्व न देता दिवसरात्र मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतात. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत चालणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहाला विळे पंचक्रोषीतील भाविक आवर्जून सहभागी होतात. यादरम्यान दररोज नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आपली सेवा देत असतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी करतात.  मंदिरात येणाऱ्या भाविकांना व विळे पंचक्रोतील ग्रामस्थांना भोजनरुपी महाप्रसादाचा लाभ होतो. दुपारी व सायंकाळी दोन्ही वेळेला भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. सालाबादप्रमाणे यंदाही भाविकां...
Image
रायगड जिल्हा गोपाळ समाजाच्या वतीने समाज सुपुत्र संजय होळकर गुरुजी यांचा सत्कार गोरेगाव (अजय होळकर) : रायगड जिल्हा गोपाळ समाज मंडळाची सभा गोपाळवाडी वाकण (राधाकृष्ण मंदिर) ता.पोलादपूर येथे संपन्न झाली. त्यावेळी रायगड जिल्हा गोपाळ समाजाच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून समाजाचे सुपुत्र तथा आदर्श शिक्षक संजय जयराम होळकर गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना (कोविड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील राधाकृष्ण मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ  देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रम बद्दल बोलताना श्री. होळकर गुरुजी यांनी सांगितले की, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे. मी निश्चितपणे यापुढेही माझी ही सेवा प्रामाणिकपणे करत राहून माझ्या गावाचे, समाजाचे नाव सदैव उंचावत ठेवण्याचा प्रयत्न करत राहीन. सामाजिक कार्य करताना व्यसनमुक्ती, शिक्षण व समाजाचा सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच कटीबद्ध आहोत. विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. मी माझ्या गावाचा, समाजाचा सदैव ऋणी राहीन. त्यांनी माझ्या शैक्षणिक, साम...
Image
फिनिक्स राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न   इंदापूर (संतोष मोरे) : सांगलीतील फिनिक्स क्रीडा संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या खेळाडूंना फिनिक्स पुरस्काराने उपायुक्त स्मृती पाटील, ओंकार शुक्ल, नगरसेवक विनायक सिंहासने यांनी सन्मानित केले. राज्य  व राष्टीय स्तरावर उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गुणगौरव व क्रीडा क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक यांना फिनिक्स क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम खरे सांस्कृतिक भवन, विश्रामबाग येथे संपन्न झाला. या पुरस्कारासाठी राज्यातील १५ शिक्षक, ७ क्रीडा शिक्षक, ४५ खेळाडू, २ संघटक यांची वर्णी लागली होती. कोकणातील रायगडमधून माणगांव तालुक्यातून श्रयेश गमरे, आर्यन गमरे, अर्जुन मोहिते, रुद्राक्ष मोरे व अर्णव भेकरे यांना फिनिक्स राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Image
बहुजन हितकारिणी सभा सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन इंदापूर (संतोष मोरे) : बहुजन हितकारिणी सभा सन २०२१ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार पी. टी. मालोरे  यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक-अध्यक्ष रविंद्र जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोर शिर्के तसेच माणगांव तालुका कार्याध्यक्ष संतोषभाऊ मोरे, माणगांव सचिव भीमराव मोरे, सचिव मंगेश पवार, जनार्दन सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Image
रायगड जिल्ह्यात काही 'नवशिके' पोलीस उपनिरीक्षक!   यांना 'दिवाणी' आणि 'फौजदारी' यांतील फरक कळत नाही!   हे 'नवशिके' पी.एस.आय. पोलीस दलात काय दिवे लावणार?   रायगड (विशेष प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांत पोलीस उपनिरीक्षक (P.S.I.) भरती झालेेले आहेत. पण यांचे अज्ञान पाहता हे P.S.I. बनले तरी कसे? हे कॉपी करून P.S.I. ची परीक्षा पास झाले का? यांना कायद्याचे नॉलेज व जनरल नॉलेज तरी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत! यांच्यापेक्षा तर पोलीस दलात आधीपासूनच कार्यरत असलेले हवालदार अधिक 'हुशार' व 'सज्ञान' असल्याचे दिसून येत आहे.  काही दिवसांपूर्वी एका भ्रष्टाचारी सरपंचाने रायगड जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली की, यूट्यूब चॅनल हे बेकायदेशीर आहेत, यांच्यावर कारवाई करावी! पण यासंदर्भात वस्तुस्थिती पाहता यूट्यूब चॅनल संदर्भात आजपर्यंत भारत देशात कोणताही कायदा आस्तित्वात नाही! त्यामुळे हे यूट्यूब चॅनल फक्त 'सोशल मिडीया' म्हणून कार्यरत आहेत! तसेच, सोशल मिडीयावर (पुरावे आस्तित्वात असतील तर) सामाजिक, कायदा-...
Image
रायगड विकास प्राधिकरणाचे काम परवानगीविना कूर्मगतीने, खुद्द अध्यक्षांची कबुली!   शासकीय बिलाबाबत शिवप्रेमींमध्ये साशंकता   विकसनाचे गणित चुकले?   माणगांव (राजन पाटील) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाचा विकास व्हावा याकरिता तत्कालीन राज्य सरकारने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली. या विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद खासदार संभाजी राजेंकडे देण्यात आले पण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडाचा विकास कामासाठी लागणारी परवानगी प्राधिकरणाने न घेताच काम सुरु केले आणि या कामासाठी आणखी किती कालावधी जाईल याबद्दलचे गणित प्राधिकरणाच्या अध्यक्षांचे चुकले असल्याचीच जणू काही प्रतिक्रिया दिल्याचे स्पष्ट केले आहे.  १९ डिसेंबरच्या कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच या कामासाठी लागणारी पुरातत्व व अन्य खात्याची पूर्व परवानगी घेतली नसल्याची कबूली दिली आहे. ही परवानगी आपण एकाच छताखाली घेतली जाईल असे मत व्यक्त केले. तसेच या तीन वर्षांत केवळ ५% च काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे आगामी ८ वर्षांत पूर्ण...
Image
चिंचवली येथे वाचनालयाचे उद्घाटन   रायगड (भिवा पवार) : चिंचवली येथील मारुती मंदिर सभागृहात रोशन संजय येरुणकर यांच्या संकल्पनेने शनिवार दि.१९ डिसेंबर २०२०रोजी मारुती रामा मालुसरे यांच्या शुभे हस्ते वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.  "एक चांगले पुस्तक हे एक हजार मित्रांच्या बरोबर असते" हे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वाक्यरचनेप्रमाणे चिंचवली गावातील शाळकरी मुले-मुलींना वाचन नव्हे, वाचनाचे व्यसन लागावे यामुळे लहान वयात लागलेली पुस्तक वाचण्याची आवड ही सुशिक्षित व सुसंस्कृत तरुण-तरुणी घडविले जावे व योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असून पुस्तकापासून दूर गेलेली मुले व मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या मुलांना पुस्तकाचे व्यसन लागावे या उद्देशाने हे वाचनालय सुरु करण्यात आले आहे.  या वाचनालयात ३ ते १०० वर्षांपर्यंत आजीवन निशुल्क सभासद असतील व हे वाचनालय २४ तास सुरु राहील व आठवड्यातून दोन दिवस दोन तास विशेष वर्ग घेतले जातील असे सांगण्यात आले आहे. या उद्घाटनाच्या वेळी चंद्रकांत येरुणकर, वैभव विचारे, महेश येरुणकर, संजय महाडिक, सुरेंद्र येरुणकर, पुजारी शांताराम भोसले यांच्यास...
Image
पाली-भिरा एसटी सेवा सुरू, पण सेवा तुटपुंजी! दिवसभरात एसटीची एकच फेरी! शाळा-कॉलेजचे विद्यार्थी करतात खाजगी वाहनातून प्रवास पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा येथे सुधागड तालुक्यातील पाली बस स्थानकातून दिवसभरात सहा-सात एसटी बसच्या फेऱ्या होतात. त्यामुळे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होतो. शिवाय पाली ते पाटणूस भिरा मार्गात येणारी जी गावे आहेत त्यांना पाली बाजार पेठ जवळ असल्याने खरेदीसाठी जाता येते. लॉकडाऊनमुळे गेली सात-आठ महिने एसटी बस सेवा खंडित झाली होती त्यामुळे ग्राहकांना पालीला जाता येत नव्हते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पाली-भिरा बस सेवा पूर्ववत सुरू होईल असे प्रवाशांना वाटत होते. परंतु पाली-भिरा करिता पेण डेपोची केवळ एकच एसटी बस सकाळी 10.15 वा. पाली डेपोतून सुटते ती भिरा येथे 11 वा. पोहचते व परत पाली कडे रवाना होते. परंतु परत येण्यास दुसरी बस नसल्याने या एसटी बस ला प्रवाश्यांचा अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पूर्वीसारख्या सर्वच एसटी बस सुरू झाल्या तर शाळा कॉलेजचे विद्यार्थी व नियमीत पालीला जाणाऱ्या प्रवाश्यांना अत्यंत सोईचे ठरेल व पूर...
Image
काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन रायगड (जानवी मेस्त्री) : उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरिता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्त रित्या संपादित करण्यात आल्या. त्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी कोटनाका येथे रेल्वे प्रकल्पाचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधीकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे. याप्रसंगी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नवनीत भोईर, हेमदास गोवारी, निलेश पाटील, सुनील भोईर, सुरज पाटील, भालचंद्र भोईर, महेश भोईर, कृष्णा जोशी, निलेश पाटील, पुरषोत्तम पाटील, सुरेश पाटील, चेतन पाटील, प्रसाद गोवारी, अजित भोईर, राजेश भोईर आदी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे प...
Image
आयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित समन्वय बैठक संपन्न माणगांव (राजन पाटील) : त्रेतायुगामधील एक पत्नी, एक वचनी, आदर्श राज्यकर्ता श्रीरामाच्या आयोध्येतील जन्मस्थानी ४५२ वर्षाच्या तपस्या व संघर्षानंतर व न्यायालयाच्या आदेशानुसार आता हिन्दूंचे आराध्य दैवत श्रीरामाच्या मंदिर बांधण्याचा उद्देश सफल होत आहे.  आयोध्येतील या मंदिर निर्माणासाठी आज देशभरातील हिन्दू जागृत होऊन स्वतः यथाशक्ती मदत करण्यासाठी तत्पर आहेत. मात्र ही अर्थिक मदत संपूर्ण हिन्दूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या मंदिराकरीता जात असल्याने सर्वांच्या सहभागाबरोबर या मंदिर निर्माणाचा इतिहास व त्याचा खरा अर्थ समजण्यासाठी देशातील जास्तीत जास्त हिन्दूंपर्यंत हा विषय अभियानाच्या माध्यमातून पोहचावा याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित समन्वयाने संघाच्या अन्य संघटना व संस्थांदवारे त्यांचे नियोजन केले जात आहे.  या धर्तीवर रायगड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याची नियोजन बैठक अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव येथे नुकतीच संपन्न झाली. सदर सभेस कोकण प्रांत सह सेवा प्रमुख श...
Image
माणगांव नगरपंचायत निवडणूकीत जनसेवा संघटना एक नवीन पर्याय, तरूण वर्गाला आवाहन, माणगांव विकास आघाडीला मदत करण्याचे आवाहन   माणगांव (राजन पाटील) : रायगड जिल्ह्यातील राजकीय  अस्तित्व व राजकीय प्रतिष्ठेची समजली जाणारी माणगांव नगरपंचायतीची आरक्षण सोडत झाली आहे. निवडणूक आयोगाने काही प्रभागात लोकसंख्येच्या निकषावरून बदल केल्याने अनेकांचे अस्तित्व कायम राखण्यात अपयश येणार असल्याचे स्पष्ट आहे. विकास झाल्याच्या नावावर बकाल होत चाललेल्या माणगांव नगराचा विकास करण्यासाठी सध्या प्रस्थापित असलेल्या माणगांवमधील भ्रष्टाचारी नगरसेवकांविरुद्ध माणगांव शहरातील सुशिक्षित व राजकीय व सामाजिक जाण असलेल्या तरूणांनी जनसेवा संघटनेचा आधार घेऊन लोकशाहीच्या माध्यमातून पूर्ण ताकतीनिशी उभे राहून माणगांव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकावे. तसेच पक्षविरहीत माणगाव नगराचा विकास करण्यासाठी तसेच स्वच्छ व सुंदर माणगांव निर्माणासाठी मी माणगावकर या ध्येयाने प्रेरीत होऊन माणगांव विकास आघाडीच्या पॅनलखाली निवडणूक लढविण्यासाठी  जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी तरूण वर्गाला आवाहन केले आहे....
Image
अभ्यासू सरपंचामुळे वडवली ग्रामपंचायत प्रगतीपथावर   सरपंच अविना मोरे यांची उत्कृष्ठ कामगिरी   ग्रामपंचायत ठरणार अनेक पुरस्कारांची मानकरी   माणगांव (राजन पाटील) : आरक्षण पद्धतीमुळे शासकीय सेवा अथवा लोकप्रतिनीधींचे प्रतिनिधित्व याबद्दल अनेक वेळा समाजातून उलट-सुलट चर्चा ऐकू येतात मात्र या प्रक्रियेला छेद देत अभ्यासू, जिज्ञासू, सेवेस तत्पर असणाऱ्या मितभाषी कु. अविना सखाराम मोरे या मे २०१८ मध्ये थेट जनतेतून निवडून आल्या. त्यांच्या अभ्यासूपणामुळे आज या वडवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामांचा धडाका लाऊन जनमानसात त्या सर्वांच्या लोकप्रिय सरपंच म्हणून गणल्या जात आहेत.  सरपंचपदावर विराजमान झाल्यावर त्यांनी २०१७-१८ मध्ये १४व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत कार्यालयाची बांधणी व सुशोभीकरणासाठी १०,००,०००/- रू.खर्च केला. वडवली मोहल्ला बसस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २,००,०००/- रूपये, रा.जि.प. शाळा वडवली कोंड या शाळेसाठी प्रोजेक्टर व कॉम्प्युटर साठी ९०,०००/-,रूपये जीवन कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी २५०००/-रूपये यामध्ये वडवली,हुरडी,कुशेडे,वाकी येथील महीलांचे दोन ग्रुप तयार करून कुशेडे...
Image
माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर बडतर्फ होण्याच्या मार्गावर? अॅड. अनिकेत ठाकूर हायकोर्टात याचिका दाखल करणार! माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याबाबत मुख्य सचिव, मंत्रालय-मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे. परंतु पुढील कारवाई काय झाली हे जाणून घेण्याकरिता आमच्या प्रतिनिधींनी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माणगांव प्रांताधिकारी यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे यासाठी स्वतः शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी मे. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल करणार आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगांव आणि तळा तालुक्यात केंद्रशासन आणि राज्यशासन विविध उपक्रमांकरिता शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून जमीन मिळकती भूसंपादित करण्यात आल्या. शासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून माणगांव उपविभागीय प्रशाली जाधव-दिघावकर यांची नेमणूक केलेली आहे. उपविभाग...
Image
क्षत्रिय मराठा समाज संघामध्ये आर्थिक घोटाळा? अॅड. अनिकेत ठाकूर यांच्याकडून फौजदारी कारवाईचे संकेत!   माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव व तळा तालुक्यातील ८४ गावांनी मिळून सन १९५२ मध्ये क्षत्रिय मराठा समाज संघाची स्थापना केली. दरम्यान २०११ पासून शासकीय निधीतून माणगांवमधील कचेरी रोडच्या मागे क्षत्रिय मराठा समाज संघाच्या सदस्यांकडून, देणगीदारांकडून, हितचिंतकांकडून लाखो रूपये गोळा करून इमारतीचे काम सुरू करण्यात आले. अॅड. अनिकेत ठाकूर यांनी पत्रव्यवहार करून देखील समाजाचे पदाधिकारी यांनी २०१६ पासून याबाबतचा लेखापरिक्षण अहवाल दिलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.  अॅड. अनिकेत ठाकूर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखापरिक्षण अहवाल मागितला असून क्षत्रिय मराठा समाज संघाची कार्यकारिणी बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमावा अशी मागणी केली आहे. समाजाच्या इमारतीचे बांधकाम करण्याच्या नावाखाली समाजातील सदस्यांची फसवणूक करून दिशाभूल करण्याचे काम येथे सुरू आहे. याप्रकरणी लवकरच न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असून समाजाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे...
Image
नगरपंचायत निवडणुक लढविण्यासाठी माणगांवमधील सुशिक्षीत व सूज्ञ नागरिकांनी पुढे यावे!    जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांचे आवाहन माणगांव (प्रतिनिधी) : बकाल होत चाललेल्या माणगांव नगराचा विकास करण्यासाठी सध्या प्रस्थापित असलेल्या माणगांवमधील भ्रष्टाचारी आणि चारित्र्यहीन नगरसेवकांविरूद्ध माणगांव शहरातील सुशिक्षीत व सामाजिक-राजकीय जाण असलेल्या नागरिकांनी लोकशाहीच्या माध्यमातून पूर्ण ताकतीनिशी निवडणुकीला उभे राहून माणगांव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरूद्ध रणशिंग फुंकावे, तसेच पक्षविरहित माणगांव नगराचा विकास करण्यासाठी व स्वच्छ, सुंदर माणगाव नगर तयार करण्यासाठी 'मी माणगांवकर' या ध्येयाने प्रेरित होऊन माणगांव विकास आघाडीच्या पॅनलखाली निवडणूक लढवावी असे आवाहन जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी केले आहे.  येथील सूज्ञ आणि निःस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या नागरिकांना लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची सुवर्णसंधी आहे. या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेऊन माणगांव विकास आघाडीच्या पॅनलखाली इच्छुक नागरिकांनी निवडणूक लढवावी आणि माणगांव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराल...
Image
झाडांना पाणी घालताना विजेचा शॉक लागून इसमाचा जागीच मृत्यू रायगड (भिवा पवार) : झाडांना पाणी घालत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गौळवाडी, ता. रोहा येथे घडली.  याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर भिकू रिकामे (वय 62, रा. गौळवाडी, ता. रोहा) हे आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या झाडांना पाणी घालत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांना उपचाराकरिता रोहे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू रजि. नं. 25/2020 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस. आर. माने हे पुढील तपास करीत आहेत
Image
झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन ट्रक ड्रायव्हरचा मृत्‍यू रायगड (भिवा पवार) : ट्रक रोरो सर्विसमध्ये लावून झोपी गेलेल्या ट्रक ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका येऊन झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोलाड रेल्वे स्टेशनजवळ घडली.  याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड रेल्वे स्टेशनजवळ रोरो सर्विसमध्ये आपली ट्रक दि. 17 डिसेंबर रोजी ट्रक ड्रायव्हर अनिल कुमार (वय 55, मुळगाव कॅलिकेट निजंडा, मल्लीड्म कॅलिकेट केरळ, हा ट्रक क्र. KA01-AA5707 रोरो मध्ये पार्किंग करून लावून झोपला असताना झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन रात्री त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू रजि. नं. 24/2020, सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस. एन. कोकाटे हे पुढील तपास करीत आहेत.
Image
माणगांव प्रांताधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांची लुबाडणूक, भूसंपादनाचा मोबदला देताना घेतले जातेय लाखो रूपयांचे कमिशन!   शेतकऱ्यांच्या हितासाठी येथे दुसरे नवीन प्रांताधिकारी नियुक्त होणे गरजेचे!   रायगड (विशेष प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील माणगांव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू असून बेकायदेशीर मार्गाने पैसे कमविण्यासाठी येथे एक अनोखी शक्कल लढविली जात असल्याचे उघडकीस आलेले आहे.  शेतकऱ्यांना भूसंपादनाचा आर्थिक मोबदला देताना संबंधित शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असते. मात्र तोच शेतकरी एखाद्या दलालामार्फत उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांच्यापर्यंत पोहोचल्यावर येथील दलाल त्यांच्याकडून चेकद्वारे कमिशन घेत असल्याचे उघडकीस आलेले आहे. त्या कमिशनची रक्कम २ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत असल्याचे दिसून आलेले आहे.  'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूजच्या टीम तर्फे भूसंपादन झालेल्या अनेक शेतकऱ्यांची बँक पासबुक एंट्री चेक करण्यात आली आहे. त्यामध्ये (धनादेश) चेकद्वारे अनेक दलालांच्या खात्यात लाखो रूपयांची रक्कम गेल्याचे निदर्शनास आल...
Image
खारभूमी योजनेच्या काचळी, पिटकिरीतील कामास ११ गाव शेतकरी संघटनेचा विरोध!   राजा केणी यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन   अलिबाग (प्रतिनिधी) : योजना मंडळ व पुनर्वसन खाते एसीआरएमपी अंतर्गत चालू होणाऱ्या काचळी, पिटकिरी खारभूमी योजना या कामास ११ गाव शेतकरी संघटना, कुसूंबळे यांनी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या पुढाकाराने तीव्र विरोध दर्शवून आक्षेप घेतला आहे.  काचळी, पिटकिरी, वाघविरा, चिखली येथील शेतकऱ्यांच्या खाडीतील असणाऱ्या सर्व सात-बारावर जे खारलँडचे शिक्के बसलेले आहेत ते काढून सात-बारा कोरा करावा व शासनाच्या नियमाप्रमाणे जो मोबदला आहे तो या शेतकऱ्यांना देण्यात यावा, या प्रमुख अटी समोर ठेऊन त्यासंदर्भातील निवेदन नुकतेच ११ गाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजा केणी यांच्या पुढाकाराने उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना देण्यात आले. 
Image
पत्रकार हरिश्चंद्र महाडीक यांची रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या प्रसिद्धी प्रमुख पदावर निवड रायगड (भिवा पवार) : सुतारवाडी येथील नामवंत पत्रकार हरिश्चंद्र महाडीक यांची रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याचे कोकण अध्यक्ष सतीश वैरागी तसेच समाजाचे अध्यक्ष भालचंद्र रहाटे यांनी नुकत्याच झालेल्या तेली समाजाच्या सभेत जाहीर केले आहे.  पत्रकार हरिश्चंद्र महाडीक हे महाराष्ट्र टुडे या न्यूज चैनलचे रायगड जिल्हा प्रतिनिधी असून ते अनेक वर्षांपासून रायगड टाइम्स, सागर, कृषीवल, तसेच अनेक वृत्तपत्रांतून जनतेच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवत असून त्यांचा आनंदनगरी कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. परिसरातील विविध घडामोडी प्रमाणे सामाजिक बातम्या आज तागायत प्रसिद्ध होऊन शासन दरबारी त्यांच्या बातम्यांची दखल घेऊन सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच समर्थन या सेवाभावी संस्थेने २००२ मध्ये शिर्डी येथे तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पत्रकारितेमधील स्कॉलरशिप दिली. आजतागायत त्यांनी रस्ते, वीज पुरवठ...
Image
विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत वडघर हायस्कूलच्या भूमी धुमाळचे यश   माणगांव (राजन पाटील) : सातत्यपूर्ण अभ्यास, समग्र वाचन, उत्कृष्ठ लेखनकौशल्य, उत्तम वक्तृत्व, प्रेमळ स्वभाव, मेहनती, प्रामाणिक, ज्ञानपिपासू अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, ता. माणगाव, जि. रायगड या शाळेच्या कु. भूमी हरिश्चंद्र धुमाळ (इ.८वी) हिने विद्यार्थी विज्ञान मंथन  परीक्षेत जिल्हा स्तरावरील गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. याअगोदर विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा, इ.५वी स्कॉलरशिप परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध करणारी कु. भूमी ही अभिजात हुशार आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात असणारी भूमी ही मुद्रे गौळवाडी येथील रहिवासी आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली विजय धारसे व तिला मार्गदर्शन करणारे श्री. विठ्ठल पवार सर व सुरेश भेदाटे सर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गांने तिचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.
Image
दापोलीमध्ये महिलेला मारहाण करून विनयभंग!   नराधम विशाल मालवणकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल   रत्नागिरी (प्रतिनिधी) : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नराधम विशाल मालवणकर याच्याविरूद्ध दापोली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३५४ (अ),(ब), ५०९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित महिला ही एका खाजगी वाहनाने मंडणगडमधून टेटवली येथे जात असताना वाकवली नाका येथे त्यांच्यासमोरून बेकायदेशिररित्या खैर लाकडाने भरलेला एक ट्रक त्यांच्यासमोरून पुढे निघून गेला व तो ट्रक टेटवली येथील विशाल मालवणकर यांच्या सुप्रिया कत्ता फॅक्टरीमध्ये शिरला. याबाबत सदर महिलेने तातडीने वनविभागाचे अधिकारी श्री. बोराटे यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी हे घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर सदर महिला तेथून एका रिक्षामध्ये बसून जाण्यास निघाली. पण त्याच वेळी विशाल मालवणकर हा त्याच्या क्रेटा गाडीतून रिक्षाचा पाठलाग करीत आला व रिक्षाचालकाला दमदाटी करून रिक्षा थांबविली. त्यानंतर त्याने सदर महिलेला ओढून बाहेर काढले व तिला चुकीच्या...
Image
बोगस शेतकरी तयार करून शासनाचे करोडो रूपये लुबाडले!   भूसंपादनाचा मोबदला देताना शेतकऱ्यांकडून घेतले जातेय लाखो रूपयांचे कमिशन! महिला शासकीय अधिकाऱ्याचा प्रताप संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा धक्कादायक प्रकार   रायगड (विशेष प्रतिनिधी) : फक्त पैसे कमविण्यासाठी पदाचा दुरूपयोग करणाऱ्या एका महिला शासकीय अधिकाऱ्याने बोगस शेतकरी तयार करून शासनाचे करोडो रूपये लुबाडलेले असून इथे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देताना दलालांमार्फत लाखो रूपयांचे कमिशन घेणे, जमिनीच्या मोबदल्याची रक्कम भलत्याच व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर करून संबंधित शेतकऱ्याची फसवणूक व मानसिक त्रास देणे आणि नंतर हे सर्व नजरचुकीने झाल्याचा बनाव करणे यांसारखे अनेक खळबळ उडवून देणाऱ्या धक्कादायक प्रकारांचा 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज तर्फे लवकरच पर्दाफाश करण्यात येणार असून शासनाची लुबाडणूक करणाऱ्या या संबंधित महिला अधिकाऱ्याचे निलंबन करणे हेच शासनाच्या हिताचे असेल!
Image
कोलाड हायस्कूल येथे १९९७ चे माजी विद्यार्थी एकत्रिकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न   विद्यार्थी एकत्रिकरणातून जुन्या आठवणींना उजाळा! रायगड (भिवा पवार) : सुधागड एज्युकेशन सोसायटी संचलित कोलाड हायस्कूल कोलाड येथे १९९७ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे एकत्रिकरण करून माजी विद्यार्थी एकत्रिकरण कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य शिरीष येरुणकर यांनी भूषविले.  याप्रसंगी प्राचार्य शिरीष येरूणकर यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव भूगोल विषयात हातखंडा असणाऱ्या व शिस्तप्रिय असणाऱ्या प्राचार्य येरुणकर सर यांनी चक्क भूगोल विषयाचा पाठही घेतला. यावेळी आपण अजूनही शिकत आहोत याची जाणीव सर्वाना झाली. सर्वांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणी सांगताना काहींच्या डोळ्यात पाणी तरळत होते. ज्या गुरूंच्या, गुरुजनांच्या सहवासात आपण शिक्षण घेतले त्या गुरुजनांचे व विद्यालयाचे आपण ऋणी आहोत याची सर्वांना जाणीव आहे आणि म्हणूनच या विद्यालयाच्या विकासाकरिता आपले ...
Image
विजय जाधव यांची आर.पी.आय. (A) गट मुंबई सचिव पदावर नियुक्ती   इंदापूर (संतोष मोरे) : रायगडचा सुपुत्र विजय जाधव यांची आर.पी.आय. (A) गट मुंबई सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या नियुक्ती बद्दल कुलाबा तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड, वार्ड अध्यक्ष (२२६) रुपेश भालेराव, युवक आघाडी तालुकाध्यक्ष विलास सपकाळ, तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  दरम्यान, या पदावर सक्रीयपणे कार्यरत राहण्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष विजय जाधव यांनी दिली.
Image
कुसूंबळे गावात '११ गाव शेतकरी संघटने'ची स्थापना  अध्यक्ष पदावर शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांची निवड   अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रुप-ग्रामपंचायत कुसूंबळे येथील स्वर्गीय जगन्नाथ गोपाळ केणी सभागृहात नुकतीच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत '११ गाव शेतकरी संघटना' ही सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली.  या संघटनेचा मूळ उद्देश हा शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा व रोजगार मिळावा हा आहे. सर्वानुमते या संघटनेच्या अध्यक्षपदावर राजा केणी यांची नियुक्ती करण्यात आली. खाडीलगत असणारी कुसूंबळे ग्रुप-ग्रामपंचायत अंतर्गत येणारी ११ गावे ही प्रामुख्याने खार भागात गणली जात असून येथील शेतकऱ्यांची बरीचशी जमीन ही खारजमीन आहे. त्यामुळे खारजमीनीत अन्नधान्य कमी प्रमाणात येते. सद्यस्थितीत वाढती महागाई, वाढती मजूरी, त्यामुळे न परवडणारी शेती, त्यात कमी उत्पादन यामुळे अक्षरशः हवालदिल व हताश झालेला शेतकरी कर्जबाजारी तर आहेच, परंतु हा शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे. या शेतकऱ्यांची बाजू व प्रश्न निर्भिडपणे मांडता यावेत व त्यांना योग्य तो न्याय, भाव व रोजगार देता यावा या दृष्टीकोनातूनच या सं...
Image
युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवक राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीवर्धन नगरपरिषद शाळा नं. 1 मध्ये रक्तदानाचे आयोजन केले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन, वडवली, श्रीवर्धन शहर या विविध भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. अलिबाग रक्तसंकलन केंद्राने डॉ. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त पिशव्याचे संकलन केले. शहर, त्याचसोबत तालुक्यातील इतर भागात राष्ट्रवादीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. नगरपरिषद शाळा क्र. 1 मध्ये आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी पक्षाच्या वतीने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी शरद पवार यांच्या जीवनावरती आधारित विविध चित्रफिती दाखविण्यात आल्या. शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीच्या माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहम्मद मेमन यांनी सांगितलं शरद पवार हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. आज आपण त्यांचा 80 वा वाढदिवस साजर...
Image
जूनी पेन्शन मिळण्याचा अडथळा दूर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश ज्ञानेश्वर म्हात्रे ठरले पेन्शनचे प्रणेते माणगांव (राजन पाटील) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त  अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अडसर ठरणारी १० जुलै २०२० ची शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली १९८१ मधील सेव शर्ती मध्ये बदल सूचवणारी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत सूचविल्याप्रमाणे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जूनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता. मात्र विधी व न्याय विभागाने ही अधिसूचना रद्द करण्यास हरकत नसल्याचे कळविले. त्या पार्श्वभूमीवर ही  अधिसूचना रद्द होण्याचा निर्णय झाला.  ही अधिसूचना रद्द व्हावी म्हणून सर्व शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांच्याबरोबर शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी.बी .म्हात्रे, आर. के. पाटील, गावंड सर व सर्व पदाधिकार...
Image
गोरेगाव पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी, गोहत्या करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद! जनसेवा संघटना व भाजपा गोरेगाव यांच्याकडून पोलीसांचे कौतुक   माणगांव (राजन पाटील) : संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कायदा असताना माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हददीतील वडवली गावाच्या कालव्याजवळ  बेकायदा गोमांस विक्री करणाऱ्या अब्बास अली लोखंडे, इरफान डावरे, फैसल डावरे, इम्तियाज डावरे या चौघांना गाईची हत्या करून विकत असताना गोरेगाव पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय सोनावणे, गणेश समेळ, हवालदार यशवंत चव्हाण, श्री. कडू, अबरगे, मोरे यांनी आपले कौशल्य पणाला लाऊन मोठ्या धाडसाने पकडले. या चौघांवर भा.दं.वि. कलम 429, 34 यांसह प्राणी रक्षण अधिनियम 1076 चे कलम5, 5(क) 6, 9, 9 (अ) 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गोरेगाव पोलीसांनी कौतुकास्पद व धाडसी  कामगिरी केल्याबद्दल जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर, सचिव योगेश पालकर तसेच गोरेगाव मधील भा.ज.पा. चे नाना महाले, युवा नेतृत्व युवराज मुंडे, हर्षद शेठ व सहकारी यांच्याकडून गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नि...
Image
कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार! - जिल्हाधिकारी   माणगांव (उत्तम तांबे) : सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क/रुमाल न वापरणे, सार्वजनिक रस्ता, बाजार, रुग्णालय, कार्यालयत थुंकणे यासाठी आता दंड म्हणून रुपये 500 आणि सर्व दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते तसेच जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांना मास्क नसेल तर 200 रुपये दंड, दुकानात ग्राहक, व्यक्ती यांनी सामाजिक अंतर व साधारण 3 फुटाचे अंतर राखले नाही तर दुकानदार मालक, विक्रेता व ग्राहकाला 1000 रुपये पथका मार्फत आकारून शासकीय पावती लगेच देण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. गावपातळीवर गटविकास अधिकारी व नगरपालिका क्षेत्र मध्ये मुख्यधिकारी वसुली अधिकारी यांना ओळखपत्र देणार आहेत. त्याचबरोबर सध्या लग्न समारंभ सुरू असून हळद आणि लग्नाला 50 पेक्षा अधिक माणसे असतील आणि मास्क लावला नसेल तर प्रत्येक व्यक्ती दंड रुपये 200 आकरण्यात येणार आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन करतील अशा व्यक्तींविरूद्ध भा.दं.वि. कलम 188, 269 व 270 यांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील ...
Image
माणगांवच्या वादग्रस्त प्रांताधिकारी बनल्या पुरस्काराच्या मानकरी!   पुरस्कार कशाबद्दल? चांगल्या कामाबद्दल, की भ्रष्टाचाराबद्दल? : नागरिकांमध्ये संभ्रम   रायगड (विशेष प्रतिनिधी) : माणगांवच्या वादग्रस्त उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांना १३ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात पुरस्कार दिला जाणार असल्याचा हास्यास्पद प्रकार उघडकीस आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे!  बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी माणगांवच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणारी तक्रार मुख्य सचिव, मंत्रालय-मुंबई यांच्याकडे दाखल झालेली असल्याने उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणारी तक्रार मुख्य सचिव, मंत्रालय-मुंबई यांच्याकडे दाखल झालेली असल्याने उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर ह्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. कायद्याचे उल्लंघन, पदाचा दुरूपयोग करणे, संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अदा करताना दलालांमार्फत कमिशन घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणू...
Image
कोरोना संकटामुळे अचानक थांबलेल्या क्रिकेट स्पर्धांच्या सत्राला पुन्हा गोरेगाव येथूनच सुरुवात! गोरेगाव (अजय होळकर) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटामुळे उद्योग धंदे कासवाच्या गतीने चालत होते व अचानक आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिक अजून त्रस्त झाले होते. लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच कोंडून बसल्याने क्रीडा क्षेत्रातही वेळ देऊन मन मोकळे करणे कठीण झाले होते. कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटामुळे गोरेगाव येथील चालू असलेली क्रिकेट स्पर्धा अचानक स्थगित करण्यात आली होती व कोरोना संकटामुळे परिसरातील क्रिकेट सत्राला पूर्ण विराम देण्यात आले होते. क्रिकेट खेळाडू, क्रिकेट संघ व क्रिकेट प्रेमी दुसरा सत्र सुरू होण्याअधी कोरोनाचे संकट दूर होण्याची जणू प्रार्थना करत होते. माणगांव तालुक्यातील गोरेगाव येथे  संपलेल्या माणगांव तालुक्यात व गोरेगाव परिसरातील क्रिकेट सत्राची ५ डिसेंबर रोजी पुन्हा गोरेगाव येथूनच श्रीफळ फोडून नूतन क्रिकेट सत्राची सुरुवात करण्यात आली.  गोरेगाव येथील शाहीन क्रिकेट क्लब आयोजित ३ दिवसीय ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत ४० पेक्षा अधिक संघाने सहभाग घेतला होता, तरी या स्पर्ध्यांच...
Image
श्रीराम मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या बैठकांचे आयोजन, माणगांव प्रखंडाची बैठक संपन्न   माणगांव (राजन पाटील) : देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी नेहमी कटीबद्ध राहून विविध जाती, पंथ व सांप्रदायात विभागलेल्या हिंदू समाजाला संघटीत करून सेवा, संस्कार व सुरक्षा या त्रिसूत्रीतून १९६४ साली स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या ४५२ वर्षांच्या अथक व अविरत संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार  आयोध्येतील श्रीरामाच्या मंदिर बांधणीसाठी परवानगी मिळाल्यावर संपूर्ण जगभरातील श्रीराम भक्तांना आनंद झाला.  संघाच्या शिकवणीतून व मार्गदर्शनातून विश्व हिंदू परिषदेच्या कठोर तपस्येतून श्रीरामाच्या मंदिर निर्माणाचे रूप ४ वर्षानंतर प्रत्यक्ष साकार होणार आहे. आयोध्येतील या श्रीराम मंदिराच्या बांधणीत देशातील, जगभरातील श्रीराम भक्तांचा सहभाग असावा यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून रामभक्तांसाठी देशातील ४ लाख  गावांत जाऊन जागरण अभियान घेऊन तसेच श्रीराम मंदिर उभारणी साठी यथाशक्ती योगदान देण्यासाठी निधीसंकलन  करण्यात येणार आहे. याकरिता गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये ...