ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

क्षत्रिय मराठा समाज संघामध्ये आर्थिक घोटाळा? अॅड. अनिकेत ठाकूर यांच्याकडून फौजदारी कारवाईचे संकेत! 

माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव व तळा तालुक्यातील ८४ गावांनी मिळून सन १९५२ मध्ये क्षत्रिय मराठा समाज संघाची स्थापना केली. दरम्यान २०११ पासून शासकीय निधीतून माणगांवमधील कचेरी रोडच्या मागे क्षत्रिय मराठा समाज संघाच्या सदस्यांकडून, देणगीदारांकडून, हितचिंतकांकडून लाखो रूपये गोळा करून इमारतीचे काम सुरू करण्यात आले. अॅड. अनिकेत ठाकूर यांनी पत्रव्यवहार करून देखील समाजाचे पदाधिकारी यांनी २०१६ पासून याबाबतचा लेखापरिक्षण अहवाल दिलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. 

अॅड. अनिकेत ठाकूर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखापरिक्षण अहवाल मागितला असून क्षत्रिय मराठा समाज संघाची कार्यकारिणी बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमावा अशी मागणी केली आहे. समाजाच्या इमारतीचे बांधकाम करण्याच्या नावाखाली समाजातील सदस्यांची फसवणूक करून दिशाभूल करण्याचे काम येथे सुरू आहे. याप्रकरणी लवकरच न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असून समाजाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे संकेत अॅड. अनिकेत ठाकूर यांनी दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog