नगरपंचायत निवडणुक लढविण्यासाठी माणगांवमधील सुशिक्षीत व सूज्ञ नागरिकांनी पुढे यावे!  

जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांचे आवाहन

माणगांव (प्रतिनिधी) : बकाल होत चाललेल्या माणगांव नगराचा विकास करण्यासाठी सध्या प्रस्थापित असलेल्या माणगांवमधील भ्रष्टाचारी आणि चारित्र्यहीन नगरसेवकांविरूद्ध माणगांव शहरातील सुशिक्षीत व सामाजिक-राजकीय जाण असलेल्या नागरिकांनी लोकशाहीच्या माध्यमातून पूर्ण ताकतीनिशी निवडणुकीला उभे राहून माणगांव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरूद्ध रणशिंग फुंकावे, तसेच पक्षविरहित माणगांव नगराचा विकास करण्यासाठी व स्वच्छ, सुंदर माणगाव नगर तयार करण्यासाठी 'मी माणगांवकर' या ध्येयाने प्रेरित होऊन माणगांव विकास आघाडीच्या पॅनलखाली निवडणूक लढवावी असे आवाहन जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी केले आहे. 

येथील सूज्ञ आणि निःस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या नागरिकांना लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची सुवर्णसंधी आहे. या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेऊन माणगांव विकास आघाडीच्या पॅनलखाली इच्छुक नागरिकांनी निवडणूक लढवावी आणि माणगांव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे, तसेच आपले माणगांव स्वच्छ, सुंदर व विकसित करण्याचे आवाहन जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी केले आहे.


Popular posts from this blog