Posts

ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨
Image
रायगड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया उपलब्ध पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वितरण अलिबाग-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बचाव उपकरणांचे वितरण पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यासह संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायतींचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. समुद्रात बुडण्याच्या किंवा पाण्यात अडचणीत सापडलेल्या पर्यटकांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया हे उपकरण उपयुक्त ठरते. हे उपकरण रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने पाण्यातील संकटग्रस्त व्यक्तीपर्यंत पोहोचविता येते. त्यामुळे बचावकार्य अधिक जलद करण्यास आणि जीवरक्षकांच्या सुरक्षिततेस मदत होऊ शकते...