रायगड जिल्ह्यात काही 'नवशिके' पोलीस उपनिरीक्षक! 

यांना 'दिवाणी' आणि 'फौजदारी' यांतील फरक कळत नाही! 

हे 'नवशिके' पी.एस.आय. पोलीस दलात काय दिवे लावणार? 

रायगड (विशेष प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांत पोलीस उपनिरीक्षक (P.S.I.) भरती झालेेले आहेत. पण यांचे अज्ञान पाहता हे P.S.I. बनले तरी कसे? हे कॉपी करून P.S.I. ची परीक्षा पास झाले का? यांना कायद्याचे नॉलेज व जनरल नॉलेज तरी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत! यांच्यापेक्षा तर पोलीस दलात आधीपासूनच कार्यरत असलेले हवालदार अधिक 'हुशार' व 'सज्ञान' असल्याचे दिसून येत आहे. 

काही दिवसांपूर्वी एका भ्रष्टाचारी सरपंचाने रायगड जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली की, यूट्यूब चॅनल हे बेकायदेशीर आहेत, यांच्यावर कारवाई करावी! पण यासंदर्भात वस्तुस्थिती पाहता यूट्यूब चॅनल संदर्भात आजपर्यंत भारत देशात कोणताही कायदा आस्तित्वात नाही! त्यामुळे हे यूट्यूब चॅनल फक्त 'सोशल मिडीया' म्हणून कार्यरत आहेत! तसेच, सोशल मिडीयावर (पुरावे आस्तित्वात असतील तर) सामाजिक, कायदा-सुव्यवस्था व धार्मिक गटबाजीचे भान ठेवून घडलेली सत्य परिस्थिती अपलोड करण्याचा अधिकार हा कायद्याने सर्वांनाच आहे! 

पण असे असताना देखील एका पोलीस उपनिरीक्षकाने या तक्रारीचा तपास अगदी अनोख्या पद्धतीने सुरू केला व एका 'भारत सरकार मान्यताप्राप्त अधिकृत वेब न्यूजच्या पत्रकारांना विचारले की, तुमच्याकडे यूट्यूब चॅनलचे लायसन्स आहे का??? यावरूनच हा पी.एस.आय. किती 'ज्ञानी' आहे ते स्पष्टपणे दिसून आले आहे! अर्थात, मिडीया आणि सोशल मिडीया यांतील फरक या पी.एस.आय. ला अजून समजलेला नाही. 

महत्वाचे म्हणजे, त्यांनी हा प्रश्न 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूजच्या पत्रकारांना विचारला होता! 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज (रजि. नं. MH27D0053921) हे भारत सरकारच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत असून सुप्रिम कोर्टाने प्रसारमाध्यमांसाठी ज्या काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज मार्फत केले जात आहे. समोर जे सत्य दिसते ते प्रसारित करणे हा मिडीयाला कायद्याने अधिकार आहे. 

असे असताना देखील एन.सी. दाखल करीन, गुन्हा दाखल करीन असे बोलून एक 'नवशिक्या' पी.एस.आय. काही अधिकृत पत्रकारांना फोनवरून घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण या 'अज्ञानी' पोलीस अधिकाऱ्याविरूद्ध 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज चे मुंबई मंत्रायल प्रतिनिधी व टीम दि. २९ डिसेंबर २०२० रोजी रोजी थेट गृहमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करणार असून अज्ञानाच्या आधारावर हा पोलीस उपनिरीक्षक बनलाच कसा? हा पी.एस.आय. म्हणून योग्य आहे का हवालदार म्हणून योग्य आहे? याबाबत चौकशीची करण्याची मागणी करण्यात येणार आहे! 

Popular posts from this blog