🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

माणगांव प्रांताधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांची लुबाडणूक, भूसंपादनाचा मोबदला देताना घेतले जातेय लाखो रूपयांचे कमिशन! 

शेतकऱ्यांच्या हितासाठी येथे दुसरे नवीन प्रांताधिकारी नियुक्त होणे गरजेचे! 

रायगड (विशेष प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील माणगांव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू असून बेकायदेशीर मार्गाने पैसे कमविण्यासाठी येथे एक अनोखी शक्कल लढविली जात असल्याचे उघडकीस आलेले आहे. 

शेतकऱ्यांना भूसंपादनाचा आर्थिक मोबदला देताना संबंधित शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असते. मात्र तोच शेतकरी एखाद्या दलालामार्फत उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांच्यापर्यंत पोहोचल्यावर येथील दलाल त्यांच्याकडून चेकद्वारे कमिशन घेत असल्याचे उघडकीस आलेले आहे. त्या कमिशनची रक्कम २ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत असल्याचे दिसून आलेले आहे. 

'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूजच्या टीम तर्फे भूसंपादन झालेल्या अनेक शेतकऱ्यांची बँक पासबुक एंट्री चेक करण्यात आली आहे. त्यामध्ये (धनादेश) चेकद्वारे अनेक दलालांच्या खात्यात लाखो रूपयांची रक्कम गेल्याचे निदर्शनास आलेले आहे. परिणामी अशा शासकीय प्रकारचे अधिकारी येथील शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागलल्याने येथे योग्य व सक्षम नवीन अधिकारी नियुक्त होणे गरजेचे असल्याची अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog