झाडांना पाणी घालताना विजेचा शॉक लागून इसमाचा जागीच मृत्यू
रायगड (भिवा पवार) : झाडांना पाणी घालत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गौळवाडी, ता. रोहा येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर भिकू रिकामे (वय 62, रा. गौळवाडी, ता. रोहा) हे आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या झाडांना पाणी घालत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांना उपचाराकरिता रोहे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू रजि. नं. 25/2020 सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस. आर. माने हे पुढील तपास करीत आहेत

Comments
Post a Comment