🚨 मुंबई - गोरेगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नावाने बनावट नोटीस पाठवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी किशन मकवाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल... 🚨 खालापूर : विवाह सोहळ्याकरीता रिसॉर्टममध्ये आलेल्या ग्राहकाचे सोन्याचे / हिऱ्यांचे दागिने चोरी प्रकरणी तिघांना अटक... 🚨 सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी, आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, एकूण 8 लाख 80 हजार रू. किमतीचे एकुण 15 मोटार सायकली हस्तगत... 🚨 लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलात आणखी चार आधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास अधिक वेगवान व सक्षम... 🚨

गोरेगाव पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी, गोहत्या करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद!

जनसेवा संघटना व भाजपा गोरेगाव यांच्याकडून पोलीसांचे कौतुक 

माणगांव (राजन पाटील) : संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कायदा असताना माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन हददीतील वडवली गावाच्या कालव्याजवळ  बेकायदा गोमांस विक्री करणाऱ्या अब्बास अली लोखंडे, इरफान डावरे, फैसल डावरे, इम्तियाज डावरे या चौघांना गाईची हत्या करून विकत असताना गोरेगाव पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय सोनावणे, गणेश समेळ, हवालदार यशवंत चव्हाण, श्री. कडू, अबरगे, मोरे यांनी आपले कौशल्य पणाला लाऊन मोठ्या धाडसाने पकडले. या चौघांवर भा.दं.वि. कलम 429, 34 यांसह प्राणी रक्षण अधिनियम 1076 चे कलम5, 5(क) 6, 9, 9 (अ) 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोरेगाव पोलीसांनी कौतुकास्पद व धाडसी  कामगिरी केल्याबद्दल जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर, सचिव योगेश पालकर तसेच गोरेगाव मधील भा.ज.पा. चे नाना महाले, युवा नेतृत्व युवराज मुंडे, हर्षद शेठ व सहकारी यांच्याकडून गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे, गणेश समेळ हवालदार कडू, उपनिरीक्षक श्री. सोनावणे, तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. 

अर्थात, यायापुढे अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत याकरिता पोलीस यंत्रणेने सतर्क रहावे. बऱ्याच वेळा गोवंश हत्या, गोहत्या झाल्यावर गुन्हे दाखल होतात मात्र त्याचे पुढे काय होते याकरिता जनसेवा संघटना पाठपुरावा करणार असल्याचे अॅड. अनिकेत ठाकूर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog