🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रायगड जिल्हा गोपाळ समाजाच्या वतीने समाज सुपुत्र संजय होळकर गुरुजी यांचा सत्कार

गोरेगाव (अजय होळकर) : रायगड जिल्हा गोपाळ समाज मंडळाची सभा गोपाळवाडी वाकण (राधाकृष्ण मंदिर) ता.पोलादपूर येथे संपन्न झाली. त्यावेळी रायगड जिल्हा गोपाळ समाजाच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून समाजाचे सुपुत्र तथा आदर्श शिक्षक संजय जयराम होळकर गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना (कोविड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील राधाकृष्ण मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ  देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रम बद्दल बोलताना श्री. होळकर गुरुजी यांनी सांगितले की, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे. मी निश्चितपणे यापुढेही माझी ही सेवा प्रामाणिकपणे करत राहून माझ्या गावाचे, समाजाचे नाव सदैव उंचावत ठेवण्याचा प्रयत्न करत राहीन. सामाजिक कार्य करताना व्यसनमुक्ती, शिक्षण व समाजाचा सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच कटीबद्ध आहोत. विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. मी माझ्या गावाचा, समाजाचा सदैव ऋणी राहीन. त्यांनी माझ्या शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक कार्याची दखल घेऊन जो  सन्मान केला त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा खूप खूप मनःपूर्वक आभार! 

या कार्यक्रमाला रायगड जिल्हा गोपाळ समाज संस्थापक तथा जेष्ठ मार्गदर्शक श्री. जयराम होळकर, श्री. चंद्रकांत होळकर अध्यक्ष, श्री.शिवाजी चव्हाण उपाध्यक्ष, श्री.अनिल माने (माजी अध्यक्ष), श्री. दीपक साबळे (माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य देवपूर ग्रामपंचायत), श्री. अनंत तावडे (खजिनदार) श्री. भिकाजी होळकर, श्री. नितीन होळकर श्री. लक्ष्मण चव्हाण, श्री. रामा साबळे, रामचंद्र माने, श्री. बंडू चव्हाण, अनंत होळकर, सुनिल होळकर, शिवाजी होळकर, इतर जेष्ठ मंडळी तसेच युवा नेते जयेश माने, चेतन होळकर, सचिन होळकर, प्रदीप चव्हाण, दिपक चव्हाण, बबन माने, नितीन साबळे, प्रकाश चव्हाण, अजय होळकर, अक्षय होळकर, दिलीप चव्हाण, सुनील चव्हाण, कल्पेश साबळे, जयेश चव्हाण, विजय चव्हाण आदी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog