अभ्यासू सरपंचामुळे वडवली ग्रामपंचायत प्रगतीपथावर 

सरपंच अविना मोरे यांची उत्कृष्ठ कामगिरी 

ग्रामपंचायत ठरणार अनेक पुरस्कारांची मानकरी 

माणगांव (राजन पाटील) : आरक्षण पद्धतीमुळे शासकीय सेवा अथवा लोकप्रतिनीधींचे प्रतिनिधित्व याबद्दल अनेक वेळा समाजातून उलट-सुलट चर्चा ऐकू येतात मात्र या प्रक्रियेला छेद देत अभ्यासू, जिज्ञासू, सेवेस तत्पर असणाऱ्या मितभाषी कु. अविना सखाराम मोरे या मे २०१८ मध्ये थेट जनतेतून निवडून आल्या. त्यांच्या अभ्यासूपणामुळे आज या वडवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामांचा धडाका लाऊन जनमानसात त्या सर्वांच्या लोकप्रिय सरपंच म्हणून गणल्या जात आहेत. 

सरपंचपदावर विराजमान झाल्यावर त्यांनी २०१७-१८ मध्ये १४व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत कार्यालयाची बांधणी व सुशोभीकरणासाठी १०,००,०००/- रू.खर्च केला. वडवली मोहल्ला बसस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २,००,०००/- रूपये, रा.जि.प. शाळा वडवली कोंड या शाळेसाठी प्रोजेक्टर व कॉम्प्युटर साठी ९०,०००/-,रूपये जीवन कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी २५०००/-रूपये यामध्ये वडवली,हुरडी,कुशेडे,वाकी येथील महीलांचे दोन ग्रुप तयार करून कुशेडे व हुरडी गटासाठी ब्युटीशियनचे प्रशिक्षण व वडवली मोहल्याच्या तरुणीसाठी १५ दिवसाचे प्रशिक्षणाचे आयोजन केले. ग्रामपंचायत हद्दीतील किशोरवयीन मुली व महिलांसाठी सॅनटरी नॉपकीनचे वाटप केले. 

वडवली कोंड येथे गावापासून सार्वजनिक विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी १,२०,०००/- ग्रामनिधी, अंगणवाडी महिला बालकल्याण अंतर्गत ४ अंगणवाड्यांना १०% आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी साठी अनुदान, अपंग कल्याण निधी अंतर्गत २५५०/- चा धनादेश ग्रामपंचायत हद्दीतील चार महसुली गावांमधील ४ अंगणवाडयाना दिले. ग्रामनिधी च्या १५% निधीतून वडवली आदिवासी वाडीवर २२ कुटुंबासाठी कुशेडे आदिवासी वाडीवरील ४२ कुटूंबाना घरोघरी नळ कनेक्शन दिले आणि सोलर सिस्टिम सोबत पाण्याची नवीन साठवण टाकी दिली. त्याचबरोबर वडवली बौद्धवाडीकरीता ६०,०००/-रू. अर्थिक मदत त्यांचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा तसेच त्यांच्या देखभाल व दुरूस्ती करीता अनुदान दिले. अशा या गुणवंत ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत सहभाग घेऊन १०,०००/- रू.चा बक्षीस प्राप्त केले. 

त्याच बरोबर या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बालकांचे संगोपन, गरोदर माता, शेतमजूर, रोजगार हमी योजना, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी,,निवास अशा सर्वच गरजांना प्राधान्य देऊन शासनाच्या विविध योजना राबवून ग्रामपंचायत लोकाभिमुखतेकडे वाटचाल करत आहे. यामध्ये प्रशासकीय साथ देणाऱ्या ग्रामसेविका निल्पा कदम, उपसरपंच यासीन हमजा डावरे यांच्यासह सर्व सदस्य व लेखनिक, डाटा ऑपरेटर, शिपाई इ. कर्मचारी या सर्वांचे सहकार्य व योगदान आहे. ही ग्रामपंचायत या सर्व विकास कामांबरोबर प्लास्टिक बंदी, पर्यावरण संरक्षण पुरक योजना, झाडे लावणे व वाढवणे, व्यसनमुक्ती, दारुबंदी, आरोग्याच्या सवयी, लसीकरण यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. 

कोविड-१९ च्या काळात आपण ज्या जनतेच्या विश्वासावर निवडून आलो त्या त्या जनतेच्या विश्वासाला तडा न देतात्यांच्या कठीण काळात त्यांना विशेष सहकार्य करण्यासाठी अन्न धान्य वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सरपंच अविना मोरे व उपसरपंच यासीन हमजा डावरे, ग्रामसेविका निल्पा कदम व सदस्य यांनी मेहनत घेऊन आदिवासी व सर्वसामान्य जनतेला मोठा आधार दिला. ३ जूनच्या निसर्ग चक्रीवादळात नुकसानग्रस्त ग्रामस्थांचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी याकरिता सरपंच अविना मोरे व सहकारी यांनी लक्ष देऊन त्यांना मदत मिळवून दिली. अशा या उपक्रमशील ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आज ही ग्रामपंचायत भविष्यात विविध पुरस्कारांची मानकरी ठरणार आहे.

Popular posts from this blog