ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत वडघर हायस्कूलच्या भूमी धुमाळचे यश 

माणगांव (राजन पाटील) : सातत्यपूर्ण अभ्यास, समग्र वाचन, उत्कृष्ठ लेखनकौशल्य, उत्तम वक्तृत्व, प्रेमळ स्वभाव, मेहनती, प्रामाणिक, ज्ञानपिपासू अशा अनेक गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, ता. माणगाव, जि. रायगड या शाळेच्या कु. भूमी हरिश्चंद्र धुमाळ (इ.८वी) हिने विद्यार्थी विज्ञान मंथन  परीक्षेत जिल्हा स्तरावरील गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. याअगोदर विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा, इ.५वी स्कॉलरशिप परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध करणारी कु. भूमी ही अभिजात हुशार आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात असणारी भूमी ही मुद्रे गौळवाडी येथील रहिवासी आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली विजय धारसे व तिला मार्गदर्शन करणारे श्री. विठ्ठल पवार सर व सुरेश भेदाटे सर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गांने तिचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog