विजय जाधव यांची आर.पी.आय. (A) गट मुंबई सचिव पदावर नियुक्ती 

इंदापूर (संतोष मोरे) : रायगडचा सुपुत्र विजय जाधव यांची आर.पी.आय. (A) गट मुंबई सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या नियुक्ती बद्दल कुलाबा तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड, वार्ड अध्यक्ष (२२६) रुपेश भालेराव, युवक आघाडी तालुकाध्यक्ष विलास सपकाळ, तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान, या पदावर सक्रीयपणे कार्यरत राहण्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष विजय जाधव यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog