🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

बोर्ली पंचतन (मुझफ्फर अलवारे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवक राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीवर्धन नगरपरिषद शाळा नं. 1 मध्ये रक्तदानाचे आयोजन केले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन, वडवली, श्रीवर्धन शहर या विविध भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. अलिबाग रक्तसंकलन केंद्राने डॉ. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त पिशव्याचे संकलन केले. शहर, त्याचसोबत तालुक्यातील इतर भागात राष्ट्रवादीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. नगरपरिषद शाळा क्र. 1 मध्ये आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी पक्षाच्या वतीने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी शरद पवार यांच्या जीवनावरती आधारित विविध चित्रफिती दाखविण्यात आल्या. शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीच्या माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहम्मद मेमन यांनी सांगितलं शरद पवार हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. आज आपण त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहोत. ईश्वर कृपेने त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचा व्यक्ती आगामी काळात पंतप्रधानपदी विराजमान असेल अशा स्वरूपाचे कार्य आपणास  सर्व कार्यकर्त्यांना करायचे आहे. शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शरद पवार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सदैव समर्पक भावनेने कार्य केलेले आहेत असे मोहम्मद मेमन यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश पोलेकर यांनी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व शरद पवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण सर्वजण काम करू असे सांगितले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष महंमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, उपाध्यक्ष सुचिन किर, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष सिद्धेश कोसंबे, जिल्हा युवक अध्यक्ष अफजल मेमन, दिवेआगर सरपंच उदय बापट, मयुरी वैद्य, श्रेयस जोशी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog