ब्रेकिंग न्यूज
🚨 पुणे पोलिसांचा बुधवार पेठेत मोठा दणका! अल्पवयीन मुलीची सुटका करत १५ बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात🚨

कोरोना संकटामुळे अचानक थांबलेल्या क्रिकेट स्पर्धांच्या सत्राला पुन्हा गोरेगाव येथूनच सुरुवात!

गोरेगाव (अजय होळकर) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटामुळे उद्योग धंदे कासवाच्या गतीने चालत होते व अचानक आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिक अजून त्रस्त झाले होते. लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच कोंडून बसल्याने क्रीडा क्षेत्रातही वेळ देऊन मन मोकळे करणे कठीण झाले होते. कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटामुळे गोरेगाव येथील चालू असलेली क्रिकेट स्पर्धा अचानक स्थगित करण्यात आली होती व कोरोना संकटामुळे परिसरातील क्रिकेट सत्राला पूर्ण विराम देण्यात आले होते. क्रिकेट खेळाडू, क्रिकेट संघ व क्रिकेट प्रेमी दुसरा सत्र सुरू होण्याअधी कोरोनाचे संकट दूर होण्याची जणू प्रार्थना करत होते. माणगांव तालुक्यातील गोरेगाव येथे  संपलेल्या माणगांव तालुक्यात व गोरेगाव परिसरातील क्रिकेट सत्राची ५ डिसेंबर रोजी पुन्हा गोरेगाव येथूनच श्रीफळ फोडून नूतन क्रिकेट सत्राची सुरुवात करण्यात आली. 

गोरेगाव येथील शाहीन क्रिकेट क्लब आयोजित ३ दिवसीय ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत ४० पेक्षा अधिक संघाने सहभाग घेतला होता, तरी या स्पर्ध्यांचा अंतिम सामना गोरेगाव शाहीन (ब) विरुद्ध यंग स्टार माणगांव दरम्यान खेळण्यात आला. शाहीन (ब) संघाने ने उत्कृष्ट गोलंदाजी व फलंदाजी चा प्रदर्शन करत यंगस्टार माणगांवच्या संघावर विजय मिळवून प्रथम पारितोषिक (रोख रु.२०,०००/- व चषक) पटकावले व यंग स्टार माणगाव ला (रोख रु.१०,०००/- व चषक) द्वितीय क्रमांकावर समाधानी राहण्यास भाग पाडले. व तृतीय क्रमांक (रोख रु. ५,०००/- व चषक)  अय्यान इलेव्हन माणगांव संघाने पटकावला. या स्पर्धेचा मालिकावीर पारितोषिक दानिश, गोरेगाव (ब) (बॅट व चषक). उत्कृष्ट फलंदाज शुभम माणगाव (यंग स्टार)(चषक) व उत्कृष्ट गोलंदाज अरशद, गोरेगाव (ब) (चषक) देण्यात आले. 

शाहीन क्लबच्या स्पर्धास्थळावर शाहीन क्लबचे मार्गदर्शक व युवा डॅशिंग सरपंच गोरेगाव श्री. जुबेर अब्बासी, श्री. फव्वाद आराई व ग्रा. पं. सदस्य श्री. सलीम रखानगी सतत हजर होते. तसेच गोरेगाव येथील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनीही आपली उपस्थिती दर्शवली.

Comments

Popular posts from this blog