ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

फिनिक्स राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न 


इंदापूर (संतोष मोरे) : सांगलीतील फिनिक्स क्रीडा संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या खेळाडूंना फिनिक्स पुरस्काराने उपायुक्त स्मृती पाटील, ओंकार शुक्ल, नगरसेवक विनायक सिंहासने यांनी सन्मानित केले.

राज्य  व राष्टीय स्तरावर उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गुणगौरव व क्रीडा क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक यांना फिनिक्स क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम खरे सांस्कृतिक भवन, विश्रामबाग येथे संपन्न झाला. या पुरस्कारासाठी राज्यातील १५ शिक्षक, ७ क्रीडा शिक्षक, ४५ खेळाडू, २ संघटक यांची वर्णी लागली होती. कोकणातील रायगडमधून माणगांव तालुक्यातून श्रयेश गमरे, आर्यन गमरे, अर्जुन मोहिते, रुद्राक्ष मोरे व अर्णव भेकरे यांना फिनिक्स राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog