🚨 रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा नियमित; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर आवश्यक आहे – जिल्हाधिकारी किशन जावळे... 🚨

झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन ट्रक ड्रायव्हरचा मृत्‍यू

रायगड (भिवा पवार) : ट्रक रोरो सर्विसमध्ये लावून झोपी गेलेल्या ट्रक ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका येऊन झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोलाड रेल्वे स्टेशनजवळ घडली. 

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड रेल्वे स्टेशनजवळ रोरो सर्विसमध्ये आपली ट्रक दि. 17 डिसेंबर रोजी ट्रक ड्रायव्हर अनिल कुमार (वय 55, मुळगाव कॅलिकेट निजंडा, मल्लीड्म कॅलिकेट केरळ, हा ट्रक क्र. KA01-AA5707 रोरो मध्ये पार्किंग करून लावून झोपला असताना झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन रात्री त्याचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू रजि. नं. 24/2020, सी.आर.पी.सी. 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस. एन. कोकाटे हे पुढील तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog