🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

आयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित समन्वय बैठक संपन्न

माणगांव (राजन पाटील) : त्रेतायुगामधील एक पत्नी, एक वचनी, आदर्श राज्यकर्ता श्रीरामाच्या आयोध्येतील जन्मस्थानी ४५२ वर्षाच्या तपस्या व संघर्षानंतर व न्यायालयाच्या आदेशानुसार आता हिन्दूंचे आराध्य दैवत श्रीरामाच्या मंदिर बांधण्याचा उद्देश सफल होत आहे. 

आयोध्येतील या मंदिर निर्माणासाठी आज देशभरातील हिन्दू जागृत होऊन स्वतः यथाशक्ती मदत करण्यासाठी तत्पर आहेत. मात्र ही अर्थिक मदत संपूर्ण हिन्दूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या मंदिराकरीता जात असल्याने सर्वांच्या सहभागाबरोबर या मंदिर निर्माणाचा इतिहास व त्याचा खरा अर्थ समजण्यासाठी देशातील जास्तीत जास्त हिन्दूंपर्यंत हा विषय अभियानाच्या माध्यमातून पोहचावा याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित समन्वयाने संघाच्या अन्य संघटना व संस्थांदवारे त्यांचे नियोजन केले जात आहे. 

या धर्तीवर रायगड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याची नियोजन बैठक अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव येथे नुकतीच संपन्न झाली. सदर सभेस कोकण प्रांत सह सेवा प्रमुख श्री. शिरीष देशमुख, रायगड विभाग संघचालक श्री. यशवंतराव पाटील, रायगड जिल्हा संघचालक श्री. किसन घाग सर व रायगड जिल्हा अभियान प्रमुख श्री. नितीन बामगुडे आदी मान्यवरांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याकरिता मंडळनिहाय गाव, वाड्या, वस्त्या याठिकाणी जाऊन त्यांच्या कौटुंबिक भेटी घेऊन आयोध्येतील श्रीराम मंदिर संघर्षाचा इतिहास कळावा याकरिता पत्रक व यथाशक्ती १०/- रू., १०० /- रू. व १०००/- रू. तसेच त्यावरील कुपन देणे अशा संदर्भाचा अभियान असल्याचे रायगड विभाग संघचालक श्री. यशवंतराव पाटील यांनी सांगितले. 

या अभियानात सहभागी होण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी सहभागी होऊन गावोगावी सभा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog