बोगस शेतकरी तयार करून शासनाचे करोडो रूपये लुबाडले!
भूसंपादनाचा मोबदला देताना शेतकऱ्यांकडून घेतले जातेय लाखो रूपयांचे कमिशन!
महिला शासकीय अधिकाऱ्याचा प्रताप
संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा धक्कादायक प्रकार
रायगड (विशेष प्रतिनिधी) : फक्त पैसे कमविण्यासाठी पदाचा दुरूपयोग करणाऱ्या एका महिला शासकीय अधिकाऱ्याने बोगस शेतकरी तयार करून शासनाचे करोडो रूपये लुबाडलेले असून इथे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देताना दलालांमार्फत लाखो रूपयांचे कमिशन घेणे, जमिनीच्या मोबदल्याची रक्कम भलत्याच व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर करून संबंधित शेतकऱ्याची फसवणूक व मानसिक त्रास देणे आणि नंतर हे सर्व नजरचुकीने झाल्याचा बनाव करणे यांसारखे अनेक खळबळ उडवून देणाऱ्या धक्कादायक प्रकारांचा 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज तर्फे लवकरच पर्दाफाश करण्यात येणार असून शासनाची लुबाडणूक करणाऱ्या या संबंधित महिला अधिकाऱ्याचे निलंबन करणे हेच शासनाच्या हिताचे असेल!