ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

खारभूमी योजनेच्या काचळी, पिटकिरीतील कामास ११ गाव शेतकरी संघटनेचा विरोध! 

राजा केणी यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन 

अलिबाग (प्रतिनिधी) : योजना मंडळ व पुनर्वसन खाते एसीआरएमपी अंतर्गत चालू होणाऱ्या काचळी, पिटकिरी खारभूमी योजना या कामास ११ गाव शेतकरी संघटना, कुसूंबळे यांनी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या पुढाकाराने तीव्र विरोध दर्शवून आक्षेप घेतला आहे. 

काचळी, पिटकिरी, वाघविरा, चिखली येथील शेतकऱ्यांच्या खाडीतील असणाऱ्या सर्व सात-बारावर जे खारलँडचे शिक्के बसलेले आहेत ते काढून सात-बारा कोरा करावा व शासनाच्या नियमाप्रमाणे जो मोबदला आहे तो या शेतकऱ्यांना देण्यात यावा, या प्रमुख अटी समोर ठेऊन त्यासंदर्भातील निवेदन नुकतेच ११ गाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजा केणी यांच्या पुढाकाराने उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना देण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog