ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

रायगड (जानवी मेस्त्री) : उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरिता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्त रित्या संपादित करण्यात आल्या. त्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी कोटनाका येथे रेल्वे प्रकल्पाचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधीकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे. याप्रसंगी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नवनीत भोईर, हेमदास गोवारी, निलेश पाटील, सुनील भोईर, सुरज पाटील, भालचंद्र भोईर, महेश भोईर, कृष्णा जोशी, निलेश पाटील, पुरषोत्तम पाटील, सुरेश पाटील, चेतन पाटील, प्रसाद गोवारी, अजित भोईर, राजेश भोईर आदी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog