🚨 पनवेल शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; 5 वर्षांपासून रायगड, पुणे, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतून फसवणूक करून फरार असलेला बोगस पत्रकार संजय पांडुरंग कदम याला पनवेल हद्दीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात शिताफीने अटक... 🚨

पत्रकार हरिश्चंद्र महाडीक यांची रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या प्रसिद्धी प्रमुख पदावर निवड

रायगड (भिवा पवार) : सुतारवाडी येथील नामवंत पत्रकार हरिश्चंद्र महाडीक यांची रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याचे कोकण अध्यक्ष सतीश वैरागी तसेच समाजाचे अध्यक्ष भालचंद्र रहाटे यांनी नुकत्याच झालेल्या तेली समाजाच्या सभेत जाहीर केले आहे. 

पत्रकार हरिश्चंद्र महाडीक हे महाराष्ट्र टुडे या न्यूज चैनलचे रायगड जिल्हा प्रतिनिधी असून ते अनेक वर्षांपासून रायगड टाइम्स, सागर, कृषीवल, तसेच अनेक वृत्तपत्रांतून जनतेच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवत असून त्यांचा आनंदनगरी कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. परिसरातील विविध घडामोडी प्रमाणे सामाजिक बातम्या आज तागायत प्रसिद्ध होऊन शासन दरबारी त्यांच्या बातम्यांची दखल घेऊन सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच समर्थन या सेवाभावी संस्थेने २००२ मध्ये शिर्डी येथे तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पत्रकारितेमधील स्कॉलरशिप दिली. आजतागायत त्यांनी रस्ते, वीज पुरवठा, शैक्षणिक, तसेच एसटीचा अनियमितपणा अशा समाजाला भेडसावणाऱ्या समस्या वृत्तपत्रातून मांडून समाजाला अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचे चांगले कार्य केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार तथा संपादक मनोज घोसाळकर, पत्रकार डॉ. श्याम लोखंडे, पत्रकार विश्वास निकम, पत्रकार भिवा पवार तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog