ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

माणगांवच्या वादग्रस्त प्रांताधिकारी बनल्या पुरस्काराच्या मानकरी! 

पुरस्कार कशाबद्दल? चांगल्या कामाबद्दल, की भ्रष्टाचाराबद्दल? : नागरिकांमध्ये संभ्रम 

रायगड (विशेष प्रतिनिधी) : माणगांवच्या वादग्रस्त उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांना १३ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात पुरस्कार दिला जाणार असल्याचा हास्यास्पद प्रकार उघडकीस आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे! 

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी माणगांवच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणारी तक्रार मुख्य सचिव, मंत्रालय-मुंबई यांच्याकडे दाखल झालेली असल्याने उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणारी तक्रार मुख्य सचिव, मंत्रालय-मुंबई यांच्याकडे दाखल झालेली असल्याने उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर ह्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. कायद्याचे उल्लंघन, पदाचा दुरूपयोग करणे, संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अदा करताना दलालांमार्फत कमिशन घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करणे असे प्रकार त्यांनी सुरू ठेवल्याचा आरोप आहे. 

अशा प्रकारचे शासकीय अधिकारी पुरस्काराचे मानकरी कसे काय होऊ शकतात? त्यांना हा पुरस्कार देणे म्हणजे पुरस्काराचा अपमान नव्हे का? असे अनेक प्रश्न माणगांव तालुक्यातील सूज्ञ पत्रकार व नांगरिकांसमोर उभे राहिलेले आहेत. 

शासकीय अधिकारी बघतात 'न्यूज २४ तास मराठी'च्या विरोधात कारवाई करण्याचे स्वप्न!

'घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे मराठी बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ!' अशी 'न्यूज २४ तास मराठी'ची ख्याती आहे. 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज हे भारत सरकारच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत असून सुप्रिम कोर्टाने प्रसारमाध्यमांसाठी ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज मार्फत केले जाते. कायद्याच्या चौकटीत राहूनच समोर जे सत्य दिसते ते निर्भिडपणे प्रसारित करण्याचे काम 'न्यूज २४ तास मराठी' वेब न्यूज मार्फत केले जाते. त्यामुळे कारवाई करण्याचे स्वप्न पाहण्याआधी संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याचा योग्य प्रकारे अभ्यास करून घ्यावा! असा ईशारा 'न्यूज २४ तास मराठी' तर्फे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog