ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

वरचीवाडी विळे येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी, तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे परायण

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील वरचीवाडी विळे येथे रविवारी दि. 27/12/2020 ते बुधवार दि. 30/12/2020 पर्यंत श्री दत्त मंदिरात वर्ष 34 व्या दत्त जयंतीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायणाचे आयोजन करण्यात आले होते. वरचीवाडी विळे हे बारा बलुतेदारांचे गाव, पण तरीही प्रत्येक घरातील सदस्य अगदी बालकांपासून वृद्धांपर्यंत या कार्यक्रमात सहभागी होतात. महिला घरच्या कामाला फारसे महत्व न देता दिवसरात्र मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतात. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत चालणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहाला विळे पंचक्रोषीतील भाविक आवर्जून सहभागी होतात. यादरम्यान दररोज नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आपली सेवा देत असतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी करतात. 

मंदिरात येणाऱ्या भाविकांना व विळे पंचक्रोतील ग्रामस्थांना भोजनरुपी महाप्रसादाचा लाभ होतो. दुपारी व सायंकाळी दोन्ही वेळेला भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या प्रमाणात दत्त मंदिरात गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिक गर्दी होऊ नये म्हणून दत्त मंदिर कमिटीने दत्त जयंती निमित्त भरणारी जत्राच रद्द केल्याने दत्त मंदिराबाहेर कोणतीही दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली नाही. तरीही यावर्षी वरची वाडी विळे तील श्री दत्त मंदिरातील दत्तजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. दत्त जयंतीचा कार्यक्रम यथोचित पार पाडण्यासाठी विळे पंचक्रोषीतील भाविक व ग्रामस्थ तसेच भागाड एम. आय. डी. सी. मधील कंपन्या व नामवंत यांनी सढळ हस्ते मदत केली. वरचीवाडी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ मंडळ वरचीवाडी, मुंबई सुरतकर मंडळ, महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेऊन कर्यक्रम पडला. तसेच कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येक भाविकास मास्कची सक्ती करण्यात आली होती. 

 तसेच वेळोवेळी भाविकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सूचना देण्यात येत होत्या. पालकी सोहळा पार पाडल्यानंतर काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog