माणगाव तालुका प्रेस क्लबतर्फे 'आदर्श शेतकरी पुरस्कार' सोहळा संपन्न गांगवली-मोकाशीवाडी येथे भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाचा विशेष बहुमान कृषीनिष्ठेचा सन्मान माणगाव-रायगड, दि. ७ (उत्तम तांबे) :- रायगड जिल्हा प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या माणगाव तालुका प्रेस क्लब या सेवाभावी पत्रकार संघटनेच्या वतीने बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी माणगाव तालुक्यातील गांगवली-मोकाशीवाडी येथे 'आदर्श शेतकरी पुरस्कार' वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. गांगवली आणि मोकाशीवाडी पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी दांपत्य श्री. विजय विष्णू दाखीणकर व सौ. वैभवी विजय दाखीणकर, तसेच श्री. रामदास महिपत धाडवे व सौ. शैला रामदास धाडवे या शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी योगदानाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही प्रगतशील शेतकरी दांपत्त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन 'आदर्श शेतकरी पुरस्कारा'ने अत्यंत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. शेतकऱ्यांनी दाखवलेली शेतीनिष्ठा, त्यांची नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता ...