ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज - कामगार नेते दिपकभाई रानवडे
बेणसे-रायगड, दि. ६ (चंद्रकांत अडसुळे) :- वाढत्या जागतिक तापमानाला (ग्लोबल वॉर्मिंग) आळा घालण्यासाठी झाडे अत्यंत उपयुक्त ठरतात. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्षलागवड ही आजच्या काळाची सर्वात महत्त्वाची गरज बनली आहे. वाढते प्रदूषण, ऑक्सिजनची कमतरता आणि ऋतूचक्रात होणारे बदल रोखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते श्री. दिपकभाई रानवडे यांनी केले. भारतीय श्रमिक शक्ती संघ (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे युनिट) आणि भारतीय कामगार सेना (रिलायन्स नागोठणे युनिट) यांच्या संयुक्त विद्यमाने कडसुरे येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, हे केवळ वृक्षारोपण नसून एक सामाजिक कर्तव्य आहे. फक्त झाडे लावणे पुरेसे नसून, लावलेले प्रत्येक रोप मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे आय. आर. हेड श्रीकांत गोडबोले यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज असून, अशा लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रमांना रिलायन्स व्यवस्थापन नेहमीच सहकार्य करेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भारतीय श्रमिक शक्ती संघाचे नागोठणे युनिट जनरल सेक्रेटरी चंद्रकांत अडसुळे यांनी सांगितले की, लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आमची युनियन कामगारांच्या हक्कांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबवत आहोत. या सामाजिक कार्यासाठी आम्हाला भारतीय श्रमिक शक्ती संघाचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. नितीन शिवकर, केंद्रीय कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे आणि केंद्रीय सरचिटणीस जिम्मी डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या सामाजिक उपक्रमाला रिलायन्स कंपनीचे इंडस्ट्रियल रिलेशन हेड श्रीकांत गोडबोले, भारतीय श्रमिक शक्ती संघाचे कार्याध्यक्ष दिपकभाई रानवडे, वरिष्ठ सल्लागार सुभाष खराडे, केंद्रीय सचिव संजय काकडे, नागोठणे युनिट अध्यक्ष किशोर शिर्के, युनिट जनरल सेक्रेटरी चंद्रकांत अडसुळे, रिलायन्सचे अधिकारी योगेश तलोड, अमोल सोनावणे, सीएसआर विभागाच्या वरदा कुलकर्णी, नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेश थळकर, पोलीस हवालदार मिलिंद महाडिक, पोलीस शिपाई स्वप्नील भालेराव आणि बळी पुट्टेवाड उपस्थित होते. तसेच भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी अशोक भोय, कार्याध्यक्ष पंडित तुपकर, उपाध्यक्ष विनोद गोरे, चिटणीस यशवंत डाकी, विठोबा कुथे आणि राजेश जवके यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय कार्यक्रमास उपाध्यक्ष मनोज पेढवी, उपाध्यक्ष दिनेश शिर्के, राजेश जवके, कायदेशीर सल्लागार ॲड. महेश पवार, मारुती दांडेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निलमताई विनोद शिंदे, कडसुरे गावातील ग्रामस्थ रमेश शिर्के, आशा शिर्के, रविंद्र शिर्के, रघुनाथ शिर्के, अनंत शिर्के, दीपक शिर्के, विठोबा शिर्के, भास्कर तुपकर, कडसुरे शाळेचे मुख्याध्यापक भास्कर लेंडी, शिक्षिका निर्मिती कोळी, अंगणवाडी सेविका स्वप्नाली शिर्के, मदतनीस सोनाली शिंदे, वैशाली नमन शिर्के, जयश्री गवंडकर, अस्मिता शिर्के यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रकांत अडसुळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संघटनेचे केंद्रीय सचिव संजय काकडे यांनी मानले.

Comments
Post a Comment