विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व काँग्रेस नेत्यांशी झालेल्या वागणुकीच्या निषेधार्थ उत्तर मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन
बोरीवली-मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) :- विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, श्रीमती प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे खासदार व इतर वरिष्ठ नेत्यांशी पोलिसांकडून झालेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी उत्तर मुंबई काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार मा. असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, भाजप सरकारच्या कथित दडपशाही व हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन निषेध नोंदविला. या आंदोलनाचे आयोजन आज, २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता, एस. व्ही. रोड, बोरीवली स्टेशनसमोर, बोरीवली (पश्चिम) येथे करण्यात आले आहे.
उत्तर मुंबई काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या, युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच काँग्रेस विचारांचे नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई अध्यक्ष राजपत यादव, नगरसेविका अंजली यादव, प्रगती राणे, जिल्हाध्यक्ष उ. मुं. जिल्हा, काँग्रेस महिला आघाडी, पूनम शिंदे, महासचिव जिल्हा महिला आघाडी, युवा काँग्रेस अध्यक्ष,आणि सर्व काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी आंदोलन सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले.

Comments
Post a Comment