राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी!
४४ सुवर्णपदकांसह प्रथम अजिंक्यपद
छत्रपती संभाजीनगर, दि. ३ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र थाईबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने २५ आणि २६ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याने आपले वर्चस्व प्रस्थापित करत सर्वसाधारण प्रथम अजिंक्यपद पटकावण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत तब्बल ४४ सुवर्ण, २१ रौप्य आणि ८ कांस्यपदकांची कमाई केली. या नेत्रदीपक यशामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून विजेत्या सर्व खेळाडूंची येत्या २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
या स्पर्धेत स्नेहा राऊत, अनिकेत दुशिंग, चैत्राशी काकडे, मयूर जाधव, स्वस्तिक भोसले, फिरोज अन्सारी, ऋषिकेश कुमार, करण शिरोडकर, अनन्या पाटील, मनमय झट, वर्धन कदम, एलीजा आदाकुल्ला, मानव बहेकर, मृगाक्षी पॉल, अथर्व मसुरकर, नक्ष मोरे, श्री पवार, प्रणव कांबळे, अर्णव इंगवले, जिया मांजरेकर, आराध्या नंबियार, वंश कोकरे, श्रेयश पवार, काव्या शेजला, शुभम पवार, अर्पित पदक, दर्शित माळी, अद्विका गरगडे, पूर्वा फडके, प्रियल पानसे, प्रभास रहाटे, ए रुद्रा, आस्था भगत, लावण्य झा, सिद्धी सावंत, सार्थक भगत, दृश्यम झा, यश पाटील, श्रेयश चव्हाण, स्मीत नारंगीकर, आमन जैस्वाल, सिया कोळी, साक्षात फराड आणि अथर्व भोसले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
तसेच जिजा भोसले, प्रिशा पाटील, शिवांक राणा, अविशा शिंदे, वैष्णवी सावंत, स्वामिनी शिर्के, सोहम सावंत, पल्लवी कणसे, श्रेयस कलकुटे, ओम माळी, स्वप्निल राठोड, सानवी सावंत, प्रात्विक मुंडले, अजिना मुजावर, अगस्या वैदू, आर्या लेंडवे, निष्ठा चंदाने, रयांश जाधव, विहान कालगावकर, श्रेया रहाटे, सतेज पडळकर आणि सम्यक कदम यांनी उपविजेतेपद मिळवत रौप्यपदक संपादन केले. याशिवाय हर्षित राऊत, लक्ष किरूगवल, आरुष नायर, साई मूर्ती, विक्रांत खुटाळे, तन्वी शर्मा, रिया सेल आणि अदिती पवार यांनी कांस्यपदक मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेत यज्ञेश मोरया, तृप्ती शिंदे, अनिकेत चव्हाण, प्रणव गायकवाड, मयुरेश चव्हाण, विपिन चौधरी, अमृता चव्हाण व अमर जा यांनीही उत्तम खेळ करत संघाला पाठबळ दिले.
रायगड जिल्ह्याच्या या संघाला थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व रायगड थाईबॉक्सिंगचे अध्यक्ष श्री. निलेश भोसले सर, थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ पनवेल शहराचे अध्यक्ष प्रतिक कारंडे सर आणि उरण तालुक्याचे अध्यक्ष सुरज टकले सर यांचे मोलाचे संघटन कौशल्य लाभले. तसेच प्रशिक्षक सुरेश राठोड, रोहित तळी, योगेश बैकर, सुयश पवार, वरद केणी, प्रथम बहिरा आणि ओम पिसाळ यांनी खेळाडूंना दिलेले उत्तम मार्गदर्शन या ऐतिहासिक विजयासाठी निर्णायक ठरले. खेळाडूंच्या या दणदणीत विजयाबद्दल थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर सर व अध्यक्ष श्री. फरहान नबिजी सर यांनी संपूर्ण संघाचे विशेष अभिनंदन केले आणि आगामी राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Post a Comment