विद्यार्थी उच्च शिक्षित होण्यासाठीच संस्थेचा जन्म - अध्यक्ष किशोर जैन
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात केले प्रतिपादन
नागोठणे-रायगड, दि. २४ (महेंद्र माने) :- येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात संस्थेचे सस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांची अध्यक्षतेखाली बुधवार 22 जुलै रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, व्हाईस चेअरमन संगीता जैन, सीईओ कार्तिक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी किशोर जैन यांनी संस्थेचा जन्म विद्यार्थी उच्च शिक्षित होण्यासाठीच झाला असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला आयुर्वेदिक कॉलेज प्राचार्य डॉ. ज्योती जगताप, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज प्राचार्य डॉ. परवेश यादव, फार्मसी संस्था प्राचार्य डॉ. आशिष पगारिया, (अग्निशमन आणि सुरक्षा) प्राचार्य सतीश सुर्वे, शाळा प्रिन्सिपॉल अमृता गायकवाड यांच्यासह सर्व प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
भा.ए.सो.च्या विद्यासंकुलनातील श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक कॉलेज, एस.एस.ओ.एस.पी. कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग, फार्मसी व अँडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किशोर जैन यांनी संगितले की, या कॉलेजमध्ये विविध भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. येथील प्रत्येक प्राध्यापक हा डॉक्टरेट मिळविलेले असून ते विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळेच येथील निकाल हे समाधानकारक येत असतात. मुळात येथील विद्यार्थी हा उच्चशिक्षित होण्यासाठीच या संस्थेचा जन्म झाला असल्याने येथे शिक्षणासाठी येणार्यांना सस्थेचे दरवाजे उघडे आहेत. शिक्षण घेणे सोपे आहे ते घेत असताना प्रत्येकांनी आपले ज्ञान दुसर्याला देणे गरजेचे आहे. यावर्षी पासून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे मनोध्येर्य वाढविण्यासाठी इतर उपक्रमही राबविण्याचे धोरण असल्याचे सांगून त्यासाठी कोणतेही सहकार्य करण्यास तयार असल्याचे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले. रविंद्र पारखे यांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून किशोर जैन यांनी 1996 साली लावलेला शिक्षण रूपी वृक्षाचे आज वटवृक्ष झाले असून याचा सर्वात जास्त फायदा येथील स्थानिक विद्यार्थ्यांना होत आहे. तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करून खूप मार्क मिळवून आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा असा मौलिक सल्ला देत सायबर क्राइम गुन्हा व त्याबाबत कोणती खबरदारी घ्यायची महत्वाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृगांका म्हात्रे व श्वेता गायकवाड यांनी केले.
विशेष सत्कार : सदरील कार्यक्रमात आर्या सुनील बडे या विद्यार्थिंनीने NEE परीक्षेत 720 पैकी 574 गुण तसेच JEE परीक्षेत 97.44 टके मार्क मिळवून मुलींमध्ये रोहा तालुक्यात पहिली आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते आर्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

Comments
Post a Comment