ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

रा. ​जि. प. शाळा नागोठणे क्रमांक १ मध्ये उत्साहात साजरा झाला 'प्रवेशोत्सव'
ढोल-ताशांच्या गजरात नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत!

नागोठणे-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- स्थानिक जिल्हा परिषद शाळा नागोठणे क्रमांक एक येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात झाली. शासन धोरण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारणे तसेच पटसंख्या वाढवणे या दृष्टीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. याच पार्श्वभूमीवर, १५ जून २०२६ रोजी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.

​या विशेष प्रवेशोत्सव सोहळ्याला नागोठणे विभागाचे जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री. सुमितजी काते साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी उपस्थित राहून सर्व मुलांना फुले आणि चॉकलेट्स देऊन त्यांचे लाडके स्वागत केले. आपल्या विभागातील शैक्षणिक विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या काते यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहनपर व उत्कृष्ट मार्गदर्शन केले. पहिल्याच दिवशी शासनामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि एका गणवेशाचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

​या सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. मनोज खांडेकर, विभाग संघटक दिनेशभाई घाग, श्री. परांजपे सर, भाजप शहराध्यक्ष गणेश घाग, श्री. तिरथ पोलसानी, श्री. संजय कनघरे, श्री. जलिल शिंदी, श्री. निलेश साळवी आणि दीपक लोणारी उपस्थित होते. तसेच नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुप्रिया संजय महाडिक आणि ग्रामपंचायत सदस्या पूनम प्रथमेश काळे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

​प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व वर्गांना पाना-फुलांचे तोरण लावून आणि दारापुढे आकर्षक रांगोळ्या काढून संपूर्ण शालेय वातावरण आनंदी व प्रसन्नमय करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापिका सौ. समा शेळके आणि उपशिक्षिका ज्योती सैंदाणे यांनी सर्व मुलांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. पहिल्याच दिवशी झालेल्या या सुंदर स्वागतानंतर शाळेतील नियमित शैक्षणिक अध्ययन आणि अध्यापनाला उत्साहात सुरुवात झाली.

Comments

Popular posts from this blog