ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

त्याचं वय अवघं पाच वर्षांचं आणि चिमुकल्याने ठेवला रमजानचा रोजा!

रोहा, दि. ४ (संदीप सरफळे) :- रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांनी पहिला रोजा ठेवून आपली श्रद्धा आणि संयम दाखवल्याच्या अनेक प्रेरणादायी घटना समोर आल्या आहेत. रोह्यातील छोट्या अहमदने देखील सोमवारी पहिला रमजान रोजा पूर्ण केला.

त्याचं वय अवघं पाच वर्षाचं, तरी तो सोमवारी पहाटे तो उठला, त्याने भक्तीभावाने नमाज अदा केला आणि सायंकाळी ६.५१ मिनटांपर्यंत त्याने ना अन्न मागितले ना पाणी. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ त्याने निर्जली रोजा ठेवला आणि मग नमाज अदा करून इफ्तार केला. इतक्या छोट्या वयात कु. अहमद मुल्ला याने ठेवलेल्या या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून, आज दहा रोजे (उपवास) पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात जवळपास १४ ते १५ तास, पाण्याचा थेंबही न पिता रोजा पुर्ण करण्यासाठी शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. रोह्याच्या अहमदने रोजा ठेवला, आणि १४ तास निर्जली राहिला त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog