ब्रेकिंग न्यूज
🚨 लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मुंब्र्यात धाडसी कारवाई 🚨

नागोठणे नगरीत भगवी शिवजयंती उत्साहात साजरी

नागोठणे (महेंद्र माने) :- दि. 06 मार्च 2026 — हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती फाल्गुन कृ. 3 शुक्रवार 06 मार्च रोजी नागोठणे नगरीत शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष इम्रान पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विभागीय शाखेत शिवपुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुरोहिताच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून महा शिवआरती घेण्यात आले. तसेच सायंकाळी भगव्या वातावरणात शहरातून भव्य मिरवणुक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवसेना विभागीय शाखेतून शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा परिषद सदस्य सुमित काते, उत्सव कमिटी अध्यक्ष इम्रान पानसरे यांच्यासह विलास गोळे, संतोष गायकवाड, गणपत म्हात्रे, दिनेश घाग, राजेश सुर्वे, कीर्तीकुमार कळस, प्रकाश मोरे, दीपक गायकवाड तसेच उत्सव कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिवप्रेमीच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पालखीतून भगवी मिरवणूक काढण्यात आली. या भव्य मिरवणुकीत रथ,नाचणारा घोडा,घोड्यावरील शिवाजी महाराज, बाल शिवराजे, जिजामाता, मावळे यांच्यासह भगवे झेंडे, खालूचा बाजा, ढोल-ताशांचा गजर, मर्दानी खेळ तसेच भगवे फेटे परिधान केलेल्या हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत वाजत-गाजत फटाक्याच्या आताषबाजीत  “शिवाजी महाराज कि जय”, “जय भवानी-जय शिवाजी”, “हर हर महादेव” च्या गजरात भगव्या वातावरणात निघालेली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजीमहाराज बाजार पेठ,खुमाचा नाका (मुस्लिम मोहल्ला),गांधी चौक,जोगेश्वरी मंदिर, ग्रामपंचायतमार्गे शिवसेना शाखेत सांगता करण्यात आली. या मिरवणुकीचे जागोजागी स्वागत व महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. ही मिरवणूक शाखेत आल्यानंतर आलेल्या मान्यवरांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. सदरील मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

खुमाचा नाक्यात झाले जोरदार स्वागत

छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक वाजत गाजत खुमाचा नाका (मुस्लिम मोहल्ला) येथे आल्यानंतर सोहेल पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवांकडून फटाक्यांच्या आताषबाजीत व सर्व शिवप्रेमींना पाणी व सरबतचे वाटप करून जोरदार स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog