🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

सीकेपी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


नागोठणे (महेंद्र माने) :- येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील  इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या ज्ञातीमधील विद्यार्थ्यांचा समाजाच्या जुना रामेश्वर व मारुती मंदिर ट्रस्टतर्फे रविवार 02 जून रोजी येथील श्री सिध्दीविनायक मंदिरात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य विश्वस्त सुभाष गरुडे,उदय भिसे,प्रदीप दुर्वे, नितीन देशपांडे, अजय अधिकारी यांच्यासह शंकर देशपांडे, शिरीन कारखानीस, विवेक देशपांडे, अर्चित भिसे, ऋषिकेश कारखानीस, अमोघ विळेकर, तसेच विनया देशपांडे, अमिता अधिकारी, प्रणिता पत्की, मुग्धा गडकरी, वर्षा देशपांडे, मनीषा गुप्ते, प्रियाली भिसे तसेच समाज बांधव उपस्थित होते.

समाजातील इयत्ता दहावीमधील देवश्री विजय अधिकारी, वरद विवेक देशपांडे व विनीत सचिन गुप्ते तसेच बारावीमधील श्रेया जीवन पत्की व सानिका मकरंद गडकरी या ज्ञातीमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी विश्वस्त उदय भिसे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून आगामी काळात इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये नागोठण्यातील  ज्ञातीमधील जे विद्यार्थी 90% किंवा त्याहून अधिक टक्के गुण मिळवतील त्यांना ट्रस्टतर्फे पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे घोषित करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकांतर्फे वर्षा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त अजय अधिकारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog