सांस्कृतिक अतिक्रमण रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन करा! भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे आवाहन समतेचा विचार घराघरात पोहोचवा बेणसे-रायगड, दि. २८ (चंद्रकांत अडसुळे) :- सध्याच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल युगात मोबाईल तसेच इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानवी मूल्यांचा आणि मूळ संस्कृतीचा वेगाने ऱ्हास होत चालला आहे. या काळात होणारे सांस्कृतिक अतिक्रमण रोखायचे असेल, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात तंतोतंत पालन करणे काळाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडी पेण तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या १४ व्या पुष्पानिमित्त आयोजित भव्य मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. समाजात 'नमो बुद्धाय' आणि 'जय भीम'चा जयघोष निनादत राहिला पाहिजे, तसेच बुद्धिजमचा प्रचार आणि प...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
अलिबागमध्ये 'श्री बापदेव लाईन बॉईज मित्र मंडळा'च्या वतीने सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू १५ वा साखरचौथ गणेशोत्सव सोहळा अलिबाग, दि. २९ (प्रतिनिधी) :- अलिबाग येथील प्रसिद्ध 'श्री बापदेव लाईन बॉईज मित्र मंडळ' यांच्या वतीने यंदा १५ व्या वर्षात पदार्पण करत 'लाईन बॉईजचा राजा' सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सव २०२६ मोठ्या भक्तीभावात आणि जल्लोषात सुरू आहे. सन २०१२ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाच्या वतीने आयोजित हा त्रिदिवसीय गणेशोत्सव सोमवार, २८ सप्टेंबर ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होत असून सध्या या महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. या महोत्सवाची सुरुवात सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लाडक्या बाप्पाच्या वाजतगाजत आगमन सोहळ्याने अत्यंत उत्साही वातावरणात झाली आहे. महोत्सवांतर्गत आज मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात १०.३० वाजता अत्यंत मंगलमय वातावरणात श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता ...




Comments
Post a Comment