समुद्रातील डिझेल तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश! ' पोलीस यंत्रणा खिशात असल्याचा' माफियाचा खळबळजनक दावा नवी मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) :- समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांमधून मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरी, तसेच तस्करी करणारे रॅकेट सक्रिय झाले असून, या गोरखधंद्याची पुष्टी करणारे एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग सध्या समोर आले आहे. या संभाषणामध्ये थेट पोलीस यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा दावा केला जात असल्याने खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बेलापूर येथून बोलत असल्याचे सांगणारा इस्तियाक शेख हा 'अजय' नावाच्या व्यक्तीला फोन करून धमकावत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. समुद्रात उभ्या असलेल्या 'सुप्रदा' (Supradha) नावाच्या जहाजावर काम करू नकोस आणि तिथे कोणाच्याही बोटी पाठवू नकोस, अशी तंबी इस्तियाक शेख याने अजयला दिली आहे. तू कधीही एक रुपयाचा हप्ता भरला नाहीस, असे सुनावत या जहाजाच्या कामात आडवे न येण्याचा इशारा त्याने दिला आहे. संभाषणादरम्यान शेख याने 'सियाल भाई', 'प्रशांत', 'ऋषभ' आणि 'गहलोत' या नावांचा उल्लेख करत या जहाजाचे काम आपल्या...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
रोह्यात राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का! म्हसकर, मगर, आप्पा देशमुख, डी. बी. पाटील यांच्यासह शेकडोंचा शिवसेनेत प्रवेश! “तुम्हाला सोडून लोक का चाललेत, याचा विचार करा!” – पालकमंत्री भरत गोगावले यांचा तटकरेंना नाव न घेता टोला; “रायगड बदलतोय, रोहा आता बोलतोय!” - आमदार महेंद्र दळवी यांचा एल्गार रोहा-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- रोह्याच्या राजकीय पटावर मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे पेण विधानसभा अध्यक्ष प्रमोद म्हसकर, विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील, कुणबी समाज रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. रोहा शहरातील श्रीराम मारुती चौकात हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विराट पक्षप्रवेश सोहळ्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात पालकमंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. “माणसाचे घर छोटे असले तरी मन मोठे असावे लागते...
कोलाडमध्ये काही दिवस थंडावलेला मटका पुन्हा जोमात! कोलाड पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? महिला वर्ग आक्रमक कोलाड-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात काही काळ बंद असलेला बेकायदेशीर मटका जुगार आता पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला असून मटका माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरीच्या काळात काही दिवस हा अवैध धंदा पूर्णपणे थंडावल्याचे चित्र होते; मात्र मटका चालकांनी आपले लागेबांधे वापरून हा गोरखधंदा पुन्हा जोमात सुरू केला असून स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. बंद पडलेला मटका जुगार अचानक पुन्हा कसा काय सुरू झाला, असा संतापजनक सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्यात नव्याने पदभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांचे संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही, हेच या वाढत्या अवैध अड्ड्यांवरून सिद्ध होत आहे....
शाळेतील गैरसोयींविरूद्ध आवाज उठविणाऱ्या पत्रकाराविरूद्ध विनयभंगाचा खोटा गुन्हा खारपाले पीएनपी हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेचा डाव पुन्हा एकदा फसला ...ही तर शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी मुख्याध्यापिका? ...अखेर सत्याचाच विजय! अलिबाग-रायगड, दि. ३१ (प्रतिनिधी) :- समाजाला सुसंस्कृत दिशा देणे, विद्यार्थ्यांना सत्य व नैतिकतेचे धडे शिकवणे आणि ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळेमध्ये पारदर्शकता जपणे हे एका शिक्षिकेचे व संस्थेच्या मुख्याध्यापिकेचे सर्वोच्च कर्तव्य असते. मात्र, याच पवित्र पदाचा गैरवापर करून स्वतःच्या शाळेतील गैरसोयी झाकण्यासाठी आणि त्याविरोधात वृत्तपत्रातून सातत्याने आवाज उठविणाऱ्या निर्भीड पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी विनयभंगासारख्या गंभीर कलमांचा हत्यारासारखा वापर करणाऱ्या पीएनपी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेचा डाव अखेर पूर्णपणे फसला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पेण यांनी संबंधित पत्रकाराची केलेली निर्दोष मुक्तता कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्य ठरवत, त्या निकालाला आव्हान देणारे राज्य शासनाचे फौजदारी अपील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी पूर्णपणे फे...
रोहा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश सरदार, तर उपाध्यक्षपदी नितीन पिंपळे यांची निवड संघटनात्मक बांधणीची जबाबदारी; सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार रोहा (प्रतिनिधी) :- येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारिणी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या रोहा शहराध्यक्षपदी महेश जनार्दन सरदार यांची, तर शहर उपाध्यक्षपदी निसर्गप्रेमी तथा पर्यावरण मार्गदर्शक नितीन पिंपळे यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोघांना नियुक्तीपत्र देऊन या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे शहरातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. महेश सरदार यांचा रोहा शहराच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी यापूर्वी नगरपालिकेचे गटनेते, पाणीपुरवठा सभापती आणि शिक्षण मंडळ सदस्य म्हणून प्रशासकीय कामकाजाचा ठसा उमटवला आहे. राजकीय पदांसोबतच रोह्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री...




Comments
Post a Comment