वाघेश्वर नगरातील कथित अनधिकृत बांधकामाला पाणी जोडणी? ग्रामपंचायत रोठ खुर्दकडे प्रदीप मोरे यांची तक्रार सखोल चौकशीची मागणी रोहा-रायगड, दि. ३० (किरण मोरे) :- वाघेश्वर नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून आणि त्या बांधकामाला देण्यात आलेल्या नळजोडणीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सदर बांधकाम कथितरीत्या अनधिकृत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत रोठ खुर्दकडे याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक प्रदीप काशिनाथ मोरे यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामसेवक तथा प्रशासक यांच्याकडे ही तक्रार नोंदवून संपूर्ण प्रकरणाची सखोल व तातडीने चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, वाघेश्वर नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून सदर बांधकामाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. हे बांधकाम विनापरवाना व अनधिकृत असल्याचा संशय स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यातच या बांधकामाच्या जागेवर थेट नळजोडणी देण्यात आल्याचे उघडकीस आल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचा गैरवापर जर व्यावसायिक इमारतीच्...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
सांस्कृतिक अतिक्रमण रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन करा! भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे आवाहन समतेचा विचार घराघरात पोहोचवा बेणसे-रायगड, दि. २८ (चंद्रकांत अडसुळे) :- सध्याच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल युगात मोबाईल तसेच इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानवी मूल्यांचा आणि मूळ संस्कृतीचा वेगाने ऱ्हास होत चालला आहे. या काळात होणारे सांस्कृतिक अतिक्रमण रोखायचे असेल, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात तंतोतंत पालन करणे काळाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडी पेण तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या १४ व्या पुष्पानिमित्त आयोजित भव्य मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. समाजात 'नमो बुद्धाय' आणि 'जय भीम'चा जयघोष निनादत राहिला पाहिजे, तसेच बुद्धिजमचा प्रचार आणि प...




Comments
Post a Comment