कोलाडमध्ये काही दिवस थंडावलेला मटका पुन्हा जोमात! कोलाड पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष; नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? महिला वर्ग आक्रमक कोलाड-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात काही काळ बंद असलेला बेकायदेशीर मटका जुगार आता पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला असून मटका माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरीच्या काळात काही दिवस हा अवैध धंदा पूर्णपणे थंडावल्याचे चित्र होते; मात्र मटका चालकांनी आपले लागेबांधे वापरून हा गोरखधंदा पुन्हा जोमात सुरू केला असून स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. बंद पडलेला मटका जुगार अचानक पुन्हा कसा काय सुरू झाला, असा संतापजनक सवाल आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्यात नव्याने पदभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांचे संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही, हेच या वाढत्या अवैध अड्ड्यांवरून सिद्ध होत आहे....
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
कुडा बुद्ध लेणी येथे वर्षावास धम्म प्रबोधन मालिकेचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न समता सैनिक दलाकडून प्राचीन लेणी व अनामिक दानकर्त्यांना मानवंदना शिल्पकारांना अनोखा सलाम साई-माणगाव (हरेश मोरे) :- तळा तालुक्यातील ऐतिहासिक कुडा बुद्ध लेणी येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, रायगड जिल्हा दक्षिण पुरुष व महिला कार्यकारिणी यांच्या विद्यमाने, तळा तालुका पुरुष व महिला कार्यकारिणीच्या सहकार्याने आणि संस्कार विभागाच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धम्म प्रबोधन मालिकेचा सांगता समारंभ अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्राचीन बुद्ध लेणींच्या ठिकाणी वर्षावास मालिकेतील कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनेचे रायगड जिल्ह्यात काटेकोर पालन होत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. या सोहळ्याचे सर्वात प्रमुख आणि लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे समता सैनिक दलाच्या वतीने प्राचीन बुद्ध लेणी आणि या लेणींची निर्मित...

Comments
Post a Comment