टाटा पॉवर भिरा व निरामय हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या पाककृती स्पर्धेत नीलिमा बेलोसे प्रथम
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायत हद्दीतील टाटा पॉवर भिरा यांच्या टाटा क्लब मध्ये टाटा पॉवर भिरा व निरामय हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्यक्ष 30 महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला असला तरी शेकडो महिला या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होत्या. या स्पर्धे साठी परीक्षक म्हणून टाटा पॉवर भिरा चे अधिकारी अभिजित शिंदे व निरामय संस्थेच्या अधिकारी त्रिवेणी जाधव व किरण सर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत महिलांनी उत्तम प्रतीच्या पाक कृती सादर केल्या.
स्पर्धेत नीलिमा बेलोसे या महिलेलेने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक राजश्री मेंगडे व त्रितिय क्रमांक वनिता शिंदे हिने पटकावला. उत्तेजनार्थ मंदा बांदल व कविता सावंत यांची निवड करण्यात आली. वरील पाचही महिलांनाना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाटा पॉवर कपंनीचे अधिकारी निरामय हेल्थ फाउंडेशन चे अधिकारी व टाटा पॉवर भिरा च्या सी. एस. आर. शर्मिला गोळे व बचत गटाच्या बहुसंख्य महिलांनी विशेष परिश्रम घेतले.