श्री जोगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. वासुदेव बुरसे महाराज यांचे होणार कीर्तन

नागोठणे : महेंद्र माने

येथील ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या मंदिरात 26 सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नऊ दिवस राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. वासुदेव बुरसे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमात सोमवार 26 सप्टेंबर रोजी सायं.3.00 वा. घटस्थापना,मंगळवार 27 सप्टेंबर रोजी सायं. 03 ते 06 वा. कुलस्वामिनी प्रासादिक कासु यांचे भजन,बुधवार 28 सप्टेंबर रोजी सायं. 03 ते 06 वा.गुजराती महिला मंडळ यांचे भजन, गुरुवार 29 सप्टेंबर रोजी सायं. 03 ते 06 वा. स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कुंभार आळी यांचे भजन शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी सायं. 03 ते 06 वा.श्री दुर्गा सप्तशक्ती पाठ, शनिवार 01 ऑक्टोबर रोजी सायं. 03 ते 06 वा. अशोक भंडारे यांचे संगीत कार्यक्रम,रविवार 02 ऑक्टोबर रोजी सायं. 03 ते 06 वा. भोंडला व हळदीकुंकू कार्यक्रम,सोमवार 03 ऑक्टोबर रोजी सायं. 03 ते 06 वा.श्री जोगेश्वरी भजन मंडळ यांचे भजन,मंगळवार 04 ऑक्टोबर रोजी सायं. 03 ते 06 वा.महेंद्र कोंडे यांचा संगीतमय कार्यक्रम,बुधवार 05 ऑक्टोबर रोजी सायं. 03 ते 06 वा.सकाळी 10 ते 11 वा.  मेघ नीलेश पोटे यांचे वासरी वादन तबला वादकसाथ पुष्कर महाजन व सर्वेश गूरव तसेच सोमवार 26 सप्टेंबर ते मंगळवार 04 ऑक्टोबर पर्यंत रोज सायं.6.00 ते 7.00 वा.संतसेवा मंडळ नागोठणे हरिपाठ, सायं.7.00 ते 7.30 वा.आरती,रात्री 7.45 ते 09.00 पर्यंत गरबा नृत्य,रात्री 9.30 ते 11.30 वा. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. वासुदेव बुरसे महाराज यांचे कीर्तन होणार असल्याची माहिती उत्सव कमिटी अध्यक्ष नितिन राऊत यांनी दिली असून, हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नरेंद्र जैन,सचिव भाई टके, उत्सव कमिटी अध्यक्ष नितिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष रूपेश नागोठणेकर,सचिव मंगेश कामथे,सहसचिव संजय नांगरे,खजिनदार प्रथमेश काळे,सहखाजिनदार सुदर्शन कोटकर यांच्यासह ट्रस्ट व उत्सव कमिटी पदाधिकारी,सदस्य अपार मेहनत घेत आहेत.

Popular posts from this blog