🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

पेण येथे राज्यस्तरीय एल्बोबॉक्सिंग सेमीनार संपन्न

चंद्रशेखर सावंत : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने क्रीडा व युवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड  यांच्या अनुशंगाने हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत व महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग असोशिएशन यांच्या विद्यमाने पेण येथे रायगड एल्बोबॉक्सिंग असोशिएशन ने राज्यस्तरिय एल्बोबॉक्सिंग रेफ्री सेमीनार आयोजित केले होते. या सेमीनारमध्ये धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नंदुरबार व रायगड  येथून जवळजवळ 42 जणांनी रेफ्रि सेमीनार मध्ये सहभाग घेतला ह्या सेमीनार द्वारे हरघर तिरंगा चा संदेश देण्यात आला ह्या  सेमीनारचे उद्घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.श्री. मंदार पनवेलकर सर ह्यांनी केले ह्या सेमीनार मध्ये सर्व प्रशिक्षणार्थिंना महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग चे अध्यक्ष श्री.सुरेश कोळी, श्री. सागर कोळी, श्री. संदीप माने यांनी मार्गदर्शन केले व ह्या कार्यक्रमा साठी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक सर तसेच पेण तालुका क्रीडा अधिकारी सौ. अंकिता मयेकर यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. हे संपूर्ण सेमीनार रायगड एल्बोबॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष श्री. रविंद्र म्हात्रे (पप्पू सर) यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले.

Comments

Popular posts from this blog