🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

रोहा वनविभागाची धडक कारवाई! बेकायदा खैर तस्करीचा पर्दाफाश

रोहा (समीर बामुगडे) : उपवनसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनखाली मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा श्री. कांबळी, माणगांव वनअधिकारी श्री. प्रदीप पाटील, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनरक्षक शेणवई श्री तेजस नरे, वनरक्षक मेढा योगेश देशमुख वनरक्षक कुशेडे किशोर वाघमारे, वनपाल माणगांव गायकवाड व राऊंड स्टाफ माणगांव यांनी विघावली फाटा मुंबई गोवा महामार्गावर मोरया धाब्या जवळ टाटा ट्रक क्र. MH.16.Q.7151 तपासले असता त्यामधे अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेलं खैर सोलिव माल 9.225 घ.मी. किंमत 15530/- व ट्रक अंदाजे किंमत 5,00,000/- इतके एकूण 5,15,530/- इतका मुद्देमाल व आरोपी उमेश जयसिंग ढवळे रा. बारामती वडगाव निंबाळकर सह जप्त केला. 

तसेच आजूबाजूला तपास केला असता कशेणे गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर टाटा एस क्र. MH.06.BG.0089 मागील ताडपत्री उघडून तपासले असता सदर टेम्पोमध्ये खैर सोलीव नग 13 घ.मी. 0.237 किंमत 3374/- रुपये इतका व टेम्पो किंमत 60,000/- असे एकूण 63,374/- इतका मुद्देमाल बेवारस जमा करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

Comments

Popular posts from this blog