🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

राज्यस्तरीय 'शिक्षण माझा वसा' पुरस्काराने अजित शेडगे सन्मानित 

प्रा. अनिरुद्ध देशपांडे व शरद कुंटे यांच्या हस्ते सन्मान 

माणगांव (राजन पाटील) : शिक्षणविवेक व टी. बी. लुल्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा 'शिक्षण माझा वसा' राज्यस्तरीय पुरस्कार माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अजित मारूती शेडगे यांना प्रा. अनिरुद्ध देशपांडे व शरद कुंटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्वातंत्यवीर सावरकर अध्यासन पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिवर्षी राज्यस्तरावर शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षणविवेक व टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने सदरचा पुरस्कार दिला जातो. 

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य क्षेत्राची आवड निर्माण करणारे व विविधांगी उपक्रमांतून वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांना सहाय्यभूत होणाऱ्या अजित शेडगे यांना सदरचा पुरस्कार मिळाल्याबददल छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे संस्था पदाधिकारी अध्यक्ष नंदकुमार जोशी, अ. ज. पांचाळ, शालेय समिती अध्यक्ष आशुतोष देवधर, भारती वेदपाठक, म. स. जाधव शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर व चेअरमन टी. बी. लुल्ला, चॅ. फा. किशोर लुल्ला, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. 

Comments

Popular posts from this blog