अण्णासाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.१८ %
महाड (विकास गायकवाड) : महाड तालुक्यातील रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधाकर तथा अण्णासाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी चा निकाल ९८.१८ % लागला. विद्यालयातून कु. कीर्ती सुधिर जाधव ८६.६०. % मिळवून प्रथम, प्रफुल प्रविण महाडिक ८१.८० % मिळवून द्वितीय तर स्वप्नील हरेश घुमटेकर ८१.६० टक्के मिळवून तृतीय आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा.माणिकराव जगताप. संस्थेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शोभाताई सावंत, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सि.दौ. सकपाल,. संस्थेचे सहकार्यवाह श्री.महेंद्र पाटेकर, संस्थेचे खजिनदार तथा शाळा सामिती सभापती प्रभाकर महामुणकर, संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच पालक शिक्षक संघ यांनी कौतुक व अभिनदन केले. विद्यालयाच्या निकालाची विशेष बाब म्हणजे जनकल्याण व जीवनविकास केंद्र या आदिवासी हॉस्टेलचे सर्वच विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून या पैकी कु. स्वप्निल हरेश घुमटेकर हा व ८१.६० % .गुण मिळवून विद्यालयात तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला व कु. शितल रामचंद्र जगताप हिला ७२.२० टक्के गुण मिळाले.या मुलांनी आपल्या परिस्थितीवर मात करून अफाट कष्ट व जिद्दीच्या जोरावर एवढे चांगले यश संपादन केले आहे. यामुळे महाड परिसरात तसेच जन कल्याण व जिवन विकास ट्रस्ट चे व्यवस्थापक मंडळ यांनीही त्यांचे कौतुक केले.