ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
लेखन स्पर्धेत नंदकुमार मरवडे यांचे सुयश


रोहे (समीर बामुगडे) :
रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावचे सुपुत्र तथा श्रमिक विद्यालय चिल्हे येथील उपक्रमशिल शिक्षक नंदकुमार मरवडे यांनी वेद फाऊण्डेशन तर्फे आयोजित ऑनलाईन लेखन स्पर्धेत सुयश संपादित केले आहे.

वेद फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांच्या संकल्पनेतून वेद फाऊंडेशनद्वारा लाँकडाऊन कालावधीत साहित्य रसिकांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा या उद्देशाने आयोजित व द्वितीय मराठी भाषा साहित्य प्रसार अभियानांतर्गत ऑनलाईन 'माझं बालपण' या विषयावर आधारित लेखन स्पर्धेत नंदकुमार मरवडे यांनी सुयश संपादित केले आहे.

आखाती देशातील बेहरींन बेटावर वास्तव्यास असणाऱ्या, जेष्ठ विश्वस्त तथा सचिव माधुरी शरदचंद्र कुलकर्णी यांनी दूरचित्रवाणी माध्यमातून निवडक दर्जेदार कथेमध्ये नंदकुमार मरवडे यांच्या कथेची दखल घेऊन त्यांना ई-सन्मानपत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या सुयशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

Popular posts from this blog