🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨
खासदार सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे सलुन कारागिर कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 



माणगांव (प्रतिनिधी) :
रत्नागिरी रायगडचे विकासपुरुष लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे माणगांव, निजामपुर व गोरेगांव विभागातील हातावर पोट असणाऱ्या नाभिक समाज सलुन कारागिर यांच्या कुटुंबाना सुमारे 150 जीवनावश्यक वस्तुंचे किट सलुन कारागिरांच्या प्रपंचाला हातभार लागावा म्हणुन दिनांक 11 मे रोजी वाटप करण्यात आले.


नाभिक समाज सलुन कारागिर हा वर्ग हातावर पोट असणाऱ्या बारा बलुतेदारापैंकी समाज आहे. देशावर कोरोना संकट असताना सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व सलुन दुकाने बंद झाली आणि कारागिरांना कुटुंब कसे चालवावे असा पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र अद्यापर्यंत वैयक्तीक स्वच्छतेचा महत्वाचा संदेश देणारा हा वर्ग मदतीकरिता पुढे आलेल्या अनेक समाजसेवी संस्थापासुन दुर्लक्षित राहीला होता. याची खात्री करुन रायगडच्या पालकमंत्री कु. आदीती तटकरे यांच्या प्रेरणेने व कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरीषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्यातुन व लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यामातुन गरजु सलुन कारागिर बांधवाना जीवनावश्यक वस्तुंच्या किट चे वाटप करण्यात आले.

नाभिक समाज सलुन कारागिर बांधवापैकी कोणीही गरजु उपेक्षित राहु नये म्हणुन नाभिक समाजाचे रायगड जिल्हा सचिव सुदाम शिंदे, रायगड जिल्हा विश्वस्त दत्तात्रय पांडे, रायगड जिल्हा संघटक जयंत शिंदे, जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली व पाठपुरावा केला.
माणगांवमध्ये या जीवनावश्यक वस्तू  वाटप करताना शहर कमिटी अध्यक्ष शिवदास काशिद, नितीन शिंदे, अभी खंडागऴे, अजित हुजरे, आशिष जाधव व जेष्ठ समाजनेते दिलिप जाधव, युवा समाज नेतृत्व सौरभ पांडे व सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
नाभिक समाज सलुन कारागिरांना या राष्ट्रीय आपत्ती काऴात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केल्यामुऴे सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे नाभिक समाज सलुन कारागिरांकडुन आभार व्यक्त केले जात आहेत.

Popular posts from this blog