भारतीय बौद्ध महासभेच्या वडखळ ग्रामशाखेच्या अध्यक्षपदी आयु. काशिनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड
बौद्ध महासभेच्या ग्रामशाखेची स्थापना
बेणसे-रायगड, दि. २१ (चंद्रकांत अडसुळे) :- कोकणाचे प्रवेशद्वार आणि ऐतिहासिक स्थान म्हणून ओळख असलेल्या वडखळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या नवीन ग्रामशाखेची नुकतीच स्थापना करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पेणचे अध्यक्ष आयु. चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ जिल्हा संघटक आयु. मारुती शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पेण येथील कार्यालयात संपन्न झालेल्या सहविचार सभेत ही स्थापना पार पडली. या ऐतिहासिक प्रसंगी वडखळ ग्रामशाखेच्या सर्व कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, वडखळ गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाजात सलोख्याचे नाते जोपासणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आयु. काशिनाथ गोविंद गायकवाड यांची ग्रामशाखेच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये सरचिटणीसपदी आयु. राजरत्न विश्वंभर गायकवाड, कोषाध्यक्षपदी आयु. नरेश चिंतामण गायकवाड, उपाध्यक्ष (संस्कार) पदी आयु. बालाजी सूर्यवंशी, उपाध्यक्ष (संरक्षण) पदी आयु. हरिश्चंद्र गायकवाड, उपाध्यक्ष (महिला) पदी आयु. स्मिताताई सुनील गायकवाड आणि उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) पदी आयु. सुभाष गायकवाड यांची निवड झाली आहे. तसेच सचिव (संस्कार) म्हणून आयु. नामदेव पांडुरंग गायकवाड, सचिव (महिला) म्हणून आयु. विशाखाताई कांबळे, सचिव (संरक्षण) म्हणून आयु. बाळू नथुराम गायकवाड, सचिव (प्रचार व पर्यटन) म्हणून आयु. अनंत शंकर सूर्यवंशी आणि कार्यालयीन सचिव म्हणून आयु. सिद्धार्थ विश्वंभर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय संघटक म्हणून आयु. संदेश गायकवाड, आयु. गोपाळ हरिभाऊ मुलगे, आयु. सुरेश भाऊराव कांबळे, आयु. आदित्य नारायण गायकवाड व आयु. मिलिंद शंकर सूर्यवंशी यांची, तर ऑडिटर पदी आयु. पृथ्वीराज मच्छिंद्र कांबळे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांनी वडखळ ग्रामशाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आयु. काशिनाथ गोविंद गायकवाड यांना दिनांक १९ जुलै २०२६ रोजी संस्थेचे अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करून पुढील धम्मकार्यासाठी आणि सामाजिक वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा संघटक मारुती शिंदे, अंनिसचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा वडखळ ग्रामशाखेचे संघटक आयु. संदेश गायकवाड, ज्येष्ठ बौद्धाचार्य आयु. पांडुरंग जाधव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आयु. सुनील धामणकर, पेण तालुका भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस आयु. सचिन कांबळे, महिला उपाध्यक्ष आयु. रेश्माताई जाधव, ज्येष्ठ संघटक प्राध्यापक एल. एन. कुमारे आणि सचिव आयु. भास्कर कांबळे यांच्यासह संस्थेचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते व वडखळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment