ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

​आमदार रवीशेठ पाटील व भाजपा रोहा तालुका अध्यक्ष महेशदादा ठाकूर यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा

'SIR' अभियान व संघटनात्मक बांधणीवर भर

​पेण-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- १९१ पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री. रवीशेठ पाटील यांची भाजपा रोहा तालुका अध्यक्ष श्री. महेशदादा ठाकूर यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, आगामी काळात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही सदीच्छा भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. बैठकीमध्ये प्रामुख्याने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या सुरू असलेल्या 'SIR' म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (Special Intensive Revision) अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत अचूकपणे नोंदवले जावे, नवमतदारांची नोंदणी वेळेत पूर्ण व्हावी आणि आवश्यक त्या सर्व दुरुस्त्यांचे काम गतीने पार पडावे, यासाठी बूथ स्तरावर प्रभावी नियोजन करण्याबाबत या नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली.

​या प्रसंगी निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाणाऱ्या 'BLA-२' (Booth Level Agent-2) यांच्या नियुक्त्या, त्यांच्यावरील जबाबदाऱ्या आणि बूथनिहाय कामाचे एकूण नियोजन यांवरही विशेष विचारविनिमय करण्यात आला. मतदारांशी सातत्याने संपर्क कसा राखायचा, नवमतदार नोंदणीची प्रक्रिया कशी वाढवायची, मतदार यादीतील त्रुटी कशा दूर करायच्या आणि प्रत्येक बूथवर पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर दोन्ही नेत्यांनी सखोल मार्गदर्शन केले. आमदार श्री. रवीशेठ पाटील यांनी यावेळी बोलताना मार्गदर्शन केले की, विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनसंपर्क वाढवण्याची गरज आहे. तसेच संघटनात्मक कामात सातत्य ठेवून प्रत्येक नागरिकापर्यंत पक्षाची भूमिका आणि शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

​या बैठकीत भाजपा रोहा तालुका अध्यक्ष श्री. महेशदादा ठाकूर यांनी रोहा तालुक्यात सुरू असलेल्या विविध संघटनात्मक उपक्रमांची माहिती आमदार महोदयांना दिली. 'SIR' अभियान यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि सर्व स्तरांतील कार्यकर्ते अत्यंत चांगल्या समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आगामी काळातही पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

​या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान 'SIR' पेण विधानसभा प्रमुख श्री. श्रीकांत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी 'SIR' अभियानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत, बूथनिहाय झालेल्या प्रगतीचा अहवाल, पुढील नियोजन तसेच कार्यकर्त्यांनी घ्यावयाच्या विशेष जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती बैठकीत मांडली. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी, प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची पोहोच प्रभावीपणे वाढविण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक समन्वयाने, नियोजनबद्ध आणि सक्रियपणे काम करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog