हा सत्कार माझ्या सफाई कामगार वर्ग व नागरिकांचा - सरपंच सुप्रिया महाडीक
सरपंच सुप्रिया महाडीक स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत असल्या बद्दल सत्कार
नागोठणे, दि. ११ मार्च (महेंद्र माने) :- येथील ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने महिला सरपंच म्हणून स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत असल्याबद्दल सत्कार करण्यात आले. यावेळी सदरचा सत्कार हा माझा नसून माझ्या सफाई कामगार वर्ग व विलीनी करणासाठी सहकार्य करणारे नागरिकांचा असल्याचे सरपंच सुप्रिया महाडीक यांनी सांगितले.
अलिगाग येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात बुधवार ११ मार्च रोजी स्वच्छतेत उत्कृष्ठ कामगिरी करणार्या महिलांसामवेत घेण्यात आलेल्या कॉफी विथ विनर या कार्यक्रमात नागोठणे ग्रामपंचायतने प्लास्टिक बंदी व प्लास्टिकचे विलगीकरण याबाबत सुरु केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सरपंच सुप्रिया महाडीक यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्च व प्रशस्ती सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना हा सत्कार माझा नसून माझ्या संपूर्ण सफाई कामगार वर्गाचा तसेच शहरातील प्लास्टीक विलीनीकरण करणारे नागरिकांचा असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी स्वच्छता व प्लॅस्टिक विलीनी करणासाठी सहकार्य तसेच प्लास्टिक पिशवी बंद करून कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन शेवटी सरपंच महाडीक यांनी केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, नागोठणे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, महिला सफाई कामगार लता वाघमारे तसेच जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते.

Comments
Post a Comment