रोहा नगरपालिकेच्या कर वसुलीला ‘गॅलेक्सी’चे ग्रहण! मोठ्यांचे लाड, सामान्यांवर जप्ती ७६ टक्क्यांवरच वसुली आटोपली रोहा, दि. १० (संदीप सरफळे) :- रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची समजली जाणारी रोहा नगरपालिकेची आर्थिक घडी यंदा विस्कटल्याचे चित्र समोर आले आहे. कर वसुलीचा टक्का थेट ७६ टक्क्यांवर घसरल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांची घसरण प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. सामान्य नागरिकांकडून वेळेवर कर वसूल करण्यात तत्पर असलेली नगरपालिका मोठ्या थकबाकीदारांसमोर मात्र हात टेकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शहरातील नामांकित ‘गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ने मिळकत कर व इमारत भाडे मिळून तब्बल १७ लाख रुपये थकविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाखोंची उलाढाल करणाऱ्या या संस्थेकडून कर वसुली करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून कर वाढवण्यात आला, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. मात्र, दुसरीकडे बडे विकासक आणि मोबाईल टॉवरधारक लाखो रुपयांचा कर बुडवत असल्याने “एक नियम गरीबांसा...
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लस आता मोफत महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी रोह्यात लसीकरण मोहिमेचा यशस्वी शुभारंभ रोहा नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम रोहा, दि. ६ (संदीप सरफळे) :- महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे या उदात्त हेतूने राज्य शासनाने हाती घेतलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहीम रोहा शहरात अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. रोहा नगरपरिषद आणि पुणे येथील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी या लसीकरण व जनजागृती मोहिमेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांमध्ये साधारणतः ३ ते ५ हजार रुपयांच्या घरात किंमत असलेली ही लस रोहा नगर परिषदेच्या विशेष पुढाकारामुळे किशोरवयीन मुलींना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. सोमवारी स्थानिक ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी सुमारे १९५ युवती व भगिनींनी लसीकरणाचा लाभ घेत आपला सहभाग नोंदवला. महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून कायमस्वरूपी संरक्षण मिळावे, या उद्देशाने या व...

Comments
Post a Comment