🚨 सातारा : जबरी चोरीचा गुन्हा उघड, २ लाख ७० हजारांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद, रहिमतपूर पोलीसांची कारवाई... 🚨 लातूर : गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात 'प्रतिबंधक कक्ष' स्थापन... 🚨 जालना : बसस्टॅन्ड रोड वरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा; ७ पुरुष आरोपी जेरबंद, १३ पीडीत महिलांची सुटका... 🚨 सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा झरे येथील लॉकर गॅस कटरने कापुन केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना उत्तर प्रदेश राज्यातून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई... 🚨 लातूर : ६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी आरोपीला अटक; संगनमताने चोरीचा बनाव उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई... 🚨

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल शहरातील खेळाडूंची ४ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कास्य पदकांची कमाई

नवी मुंबई (दिपक कायंदेकर) :- वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन, स्पोर्ट्स  ऑथोरिटी ऑफ इंडिया तसेच जेके टायर प्रस्तुत यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग टूर्नामेंट कप २०२६ के. डी. जाधव इनडोअर इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत भारतीय संघामध्ये पनवेल शहरांमधील १० खेळाडूंची निवड करण्यात आली होती तसेच संपूर्ण महाराष्ट्र मधून ९१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता तसेच परराज्यातील व परप्रांतीय देश पलेस्टाईन, उझबेकिस्तान, इराक ,इटली , कझाकिस्तान, स्विझर्लंड, नेपाळ, युरोप यासोबत २५ देशातील खेळाडूंचा समावेश होता
पनवेल शहरातील ९ वर्षाआतील वयोगटात -२४ किलोवजनी गटात  अन्वी निकम हिला पॉईंट फाईट इव्हेंट मध्ये सुवर्णपदक, ९वर्षाखालील वयोगटात -२७ किलो वजनी गटामध्ये प्रणव लब्दे कास्यपदक.
१२ वर्षा आतील वयोगटात -४२ किलोवजनी गटात काव्य सेजल हिला किक लाईट इव्हेंट मध्ये सुवर्णपदक , -१२ वर्षाआतील  वयोगटात +४७ किलोवरील वजन गटांमध्ये अर्णव इंगोले याला किकलाईट व पॉईंट फाईव्ह इव्हेंट मध्ये ०२ सुवर्णपदक,  १५ वर्षातील वयोगटात -३२ वजनी गटात रोनल पाटील याल किकलाईट व लाईट कॉन्टॅक्ट इव्हेंट मध्ये ०२ रौप्य पदक, १५ वर्षाआतील वयोगटात -३७ किलोवजनी गटामध्ये शुभम पवार याला किकलाईट व लाईट कॉन्टॅक्ट इव्हेंट मध्ये ०१ रौप्य व ०१ कास्य पदक , -१५वर्षाआतील वयोगटात -३७ किलोवजनी गटामध्ये श्रेया कुडलकर हिला पॉईंट फाईट व किकलाईट इव्हेंट मध्ये ०२कास्य पदक, १८वर्षाआतील वयोगटात -४८ किलोवजनी सानिया शेख हिला लोकिक इव्हेंट मध्ये रौप्य पदक, १९वर्षावरील +९० किलो वरील वजनी गटात आर्यन शिवतरकर याला लोकिक इव्हेंट मध्ये  कास्यपदक पटकवले.
किकबॉक्सिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय झालेल्या खेळाडूंच्या यशामागे पनवेल शहर किकबॉक्सिंग चे अध्यक्ष- श्री परेश ठाकूर साहेब, सचिव -श्री मंदार पनवेलकर सर, कार्याध्यक्ष व  सीनियर प्रशिक्षक श्री निलेश भोसले सर प्रशिक्षक योगेश बैकर , रोहित थळी यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले.
पदक वितरण प्रसंगी वाको इंडिया  किकबॉक्सिंग फेडरेशन चे अध्यक्ष संतोष अग्रवाल सर, वाको महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार सर यांनी खेळाडूंची कौतुक करून त्यांना वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog