ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रायगड जिल्ह्यात ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ठ; काॅपीमुक्त परीक्षेसाठी उपाययोजना

रायगड, दि. ९ (प्रतिनिधी) :- उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीच्या परीक्षा मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. रायगड जिल्ह्यात एकूण ५२ केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. काॅपीमुक्त परीक्षा होण्यासाठी एकूण ९ भरारी पथके तसेच पूर्ण वेळ बैठे पथक तैनात करण्यात आले आहे.
बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यानंतर विद्यार्थी आपल्या भविष्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने करायची आहे, हे ठरवतात. त्यामुळे या परीक्षेला अधिक महत्त्व देण्यात येते. परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची मदत घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीही गठीत करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी १ तास व परीक्षेनंतर १ तास बैठक पथक असणार आहे. त्यामुळे काॅपीमुक्त परीक्षा होण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे व राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांना काॅपी न करता कोणतीही भीती मनात न बाळगता परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog